Nashik ZP News : प्रशासक आज सादर करणार अंदाजपत्रक

Nashik ZP : दाजपत्रकात दिव्यांगांसह नावीन्यपूर्ण योजनांवर भर असून, त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

Nashik ZP News : गेल्या आठवड्यात दोनदा वेळ निश्चित होऊनही मुहूर्त हुकलेले जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मंगळवारी (ता. २७) सादर करण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकात दिव्यांगांसह नावीन्यपूर्ण योजनांवर भर असून, त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सवासामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात सादर होणाऱ्या अंदाजपत्रकाचा खेळ झाला. (Nashik Budget will be presented by zp administrator today)

लेखा व वित्त विभागाकडून तयार झालेले अंदाजपत्रक सादर करण्यासाठी सतत वेळ बदलली गेली. दोनदा प्रशासनाने तारखा जाहीर करूनही त्या पुढे ढकलल्या. लेखा व वित्त विभागाने दोन आठवडे मॅरेथॉन बैठका घेत अंदाजपत्रक तयार केले.

मात्र, ते सादर करण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्याचे दिसत होते. अंदाजपत्रक सादर करण्यासाठी मंगळवारचा मुहूर्त काढला आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात विविध योजनांसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यात नावीन्यपूर्ण योजनांनाही स्थान देण्यात आले आहे.

Nashik ZP
Nashik Adivasi Morcha : ‘लाल वादळा’च्या मुक्कामाने प्रशासनाची भंबेरी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

यापूर्वी मित्तल यांनी सुपर ५० सारख्या नावीन्यपूर्ण योजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त प्रशासकीय कामकाज करण्याच्यादृष्टीने अंदाजपत्रकात तरतुदी केल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश असणार आहे.

गतवर्षी ४६.२ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली होती. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली असून, नाशिक जिल्हा परिषदेचे पहिल्यांदाच ते अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अर्थसंकल्पीय सभा होणार असून, यात अंदाजपत्रक सादर केले जाईल.

Nashik ZP
Nashik Police : स्ट्रीट क्राईमविरोधात पोलीस आक्रमक! ठाणेनिहाय पायी पेट्रोलिंग अन गुन्हेगारांना दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.