Nashik News : नामपूरला लाखमोलाचा बैलबाजार फुलला! मोसम खोऱ्यात पावसाच्या हजेरीने व्यापारी सुखावले

Nashik News : नामपूर आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांकडे असणारे पशुधन दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.
Arrival of khillar bulls in the bull market in the premises of market committee in Nampur.
Arrival of khillar bulls in the bull market in the premises of market committee in Nampur.esakal
Updated on

नामपूर : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणात यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांकडे असणारे पशुधन दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. अशा प्रतिकूल परिस्थितीत येथील बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. १०) भरलेल्या बैलबाजारात खिल्लार बैलांच्या आवकेमुळे बैलाबाजार फुलला. (Bull market held in premises of Nampur Bazar Committee)

यंदा मोसम खोऱ्यात दमदार वरुणराजाने हजेरी लावल्याने बैलव्यापारी सुखावले आहेत. ‘लाखमोलाचा बैलबाजार’ म्हणून नामपूरची जिल्ह्यात ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक लाखो रुपयांची कार खरेदी करत असले तरी येथील शेतकरी एका बैलजोडीसाठी सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च करतात. गेल्यावर्षी एका तरुण शेतकऱ्याने तब्बल चार लाख अकरा हजार रुपयांना बैलजोडी खरेदी केली होती.

त्यानंतर आठवडाभरातच मुंजवाड येथील शेतकऱ्याने तब्बल पाच लाख ५१ हजारांना बैलजोडी खरेदी करून आपले सर्जा-राजावरील आपले प्रेम अधोरेखित केले. नामपूर बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बैलजोडी खरेदीसाठी साडेपाच लाखांवर बोली लागली आहे. परिस्थिती कशीही असली तरी शेतकऱ्यांचा नादच खुळा असल्याची प्रचिती नामपूरकरांना अनेकवेळा आली आली.

१९७५ पासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येथे उपबाजार आवार कार्यान्वित असल्यापासून जिल्ह्यातील वैभवशाली परंपरा असलेला बैल बाजार हे येथील वैशिष्ट्ये आहे. दर बुधवारी बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या बैलबाजारात शेकडो जनावरे विक्रीसाठी येतात. नगर जिल्ह्यातील बैल व्यापारी कर्नाटक राज्यातून बैलांची खरेदी करून परिसरातील शेतकऱ्यांना बैलांची सेवा पुरवतात. (latest marathi news)

Arrival of khillar bulls in the bull market in the premises of market committee in Nampur.
Nashik News : ‘एमडीएस’ प्रवेशासाठी नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत; राज्‍यस्‍तरीय कोट्याची प्रक्रिया

विशेष बाब म्हणजे अनेक व्यापारी शेतकऱ्यांना उधारीवर व्यवहार करतात. शेतकऱ्यांकडून टप्याटप्याने वसुली करत असतात. यंदा मोसम खोऱ्यात वरुणराजा बरसल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात बैलजोड्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत.

विशेष म्हणजे उधारीवर येथील बैलबाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने कसमादे पट्ट्यातील शेतकरी नामपूर बाजार समितीला प्रथम पसंती देतात. उत्तम प्रतीच्या बैलजोडीला लाख रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

"बाजार समितीच्या आवारात गेल्या ५० वर्षांपासून भरणाऱ्या बैलबाजारामुळे मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे. शेती व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बैलजोडींच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे सर्जा-राजावरील प्रेम मात्र कायम आहे. येथील बाजार समितीत बैल व्यापाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे." - मनीषा पगार, सभापती, नामपूर बाजार समिती

Arrival of khillar bulls in the bull market in the premises of market committee in Nampur.
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.