Illegal Bullock Cart Race: मुंढेगावातील बैलगाडा शर्यती विनापरवानगी! ग्रामपंचायती सदस्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Crime News : मुंढेगावचे उपसरपंच हितेश बुधा हंबीर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनायक गतीर, ऋषिकेश गतीर, सुनिल गतीर, वैभव साळवे व ग्रामपंचायत सदस्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते.
Bullock Cart Race
Bullock Cart Raceesakal
Updated on

नाशिक : बेकायदेशिररित्या घाेडा बैल शर्यतीचे आयाेजन करुन शर्यत पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तिवर टांगा उलटून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी घाेटी पाेलिसांनी मुंढेगावच्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Bullock cart race in Mundhegaon without permission)

मुंढेगावचे उपसरपंच हितेश बुधा हंबीर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विनायक गतीर, ऋषिकेश गतीर, सुनिल गतीर, वैभव साळवे व ग्रामपंचायत सदस्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. पोलीस अंमलदार सतिष चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेगाव शिवारात दारणा नदीपात्राजवळील मैदानात रविवारी(ता. २६) भैरवनाथ यात्रेनिमित्ताने तांगा व बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

यावेळी पोपट कचरु मुंजे (५२, रा. सारुळ, विल्होळी, ता. नाशिक) हे शर्यत पाहण्यासाठी आले होते. मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. शर्यत सुरु असतानाच एक बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून बाहेर उधळला. तो थेट बघ्यांच्या गर्दीत शिरला. त्यामुळे तिघे जण जखमी झाले. त्यानंतर बैलगाडीच्या चाकासह लोखंडी राॅड खाली येऊन पोपट मुंजे गंभीर जखमी झाले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला होता. (latest marathi news)

Bullock Cart Race
Nashik IPL Betting Crime: आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारी टोळी जेरबंद! ग्रामीण गुन्हेशाखेची कामगिरी; सट्टेबाज संशयित मुंबईतील

घटनेची माहिती मिळताच, घोटी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता, सदरची शर्यतच बेकायदेशीर आयोजित केल्याचे निष्पन्न झाले. विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन न करण्याचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रविण उदे करीत आहेत.

Bullock Cart Race
Dhule Crime News : विवाहितेवर सामूहिक बलात्कार; फरारी संशयितांना तासाभरात बेड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.