Nashik Bus Accident News : सप्तश्रृंगी गड घाटात 'एसटी' बस दरीत कोसळली; एका महिलेचा मृत्यू, २3 जखमी

Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident Newsesakal
Updated on

Nashik Bus Accident News : सप्तश्रृंगी गड घाटात राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) बस थेट दरीत कोसळून १६ महिलांसह २२ जण जखमी तर १ महिला भाविकाचा मृत्यु झाला आहे. बहुतांस जखमी ह्या मुडी ता. आमळनेर जि. जळगांव येथील आहे.

सप्तशृंग - खामगाव (बुलढाणा) ही मुक्कामी बस क्रमांक बस नं. एम एच ४० ए क्यु, 6259 ही आज सकाळी साडे सहा वाजता सप्तशृंग गडावरुन खामगांवच्या दिशेने निघाली होती.

सप्तशृंगी गडाचा दहा किमी अंतराचा घाट रस्ता दाट धुक्यात बस उतरत असतांना घाट रस्त्यातील एका धोकेदायक वळणाचा बस चालकाला अंदाज न आल्याने बस घाट रस्त्याचा संरक्षक कठडा तोडून सुमारे चारशे ते पाचशे फुट दरीत कोसळली.

बस दरीत कोसळताॆना झाडे झुडपे, व दगड यांना आडत गेल्याने काहीशी हलूवार पणे खाली आली त्यामूळे सुदैवाने मोठी जिवीत हाणी टळली असून यात आशाबाई राजेंद्र पाटील, वय ५५, रा. मुडी ता. आमलनेर या महिला भाविकाचा मृत्यु झाला आहे.

तर गजानन पांडुरंग टपके, ३९, रा. अकोला (बस चालक), पुरुषोत्तम टिकार (वाहक), प्रमीलाबाई गुलाबराव बडगुजर ६५, रा. मुडी ता. आमळणेर, रघुनाथ बळीराम पाटील वय ७० रा. भोकर जि.जळगांव, बाळु भावलाल पाटील वय ४८, रा. भोकर जि. जळगांव, लक्ष्मीबाई काळु गव्हाणे वय ४०, सप्तश्रृंगी गड, संजय बाळीराम भोईर, ६० रा. मुडी ता. आमळणेर, शिलबाई सोनू बडगुजर वय २७, रा. मुडी ता. आमळणेर, वच्छालाबाई साहेबराव पाटील, वय ६५ रा. मुडी ता. आमळणेर, सुशिलबाई बबन नजान, वय ६४ रा. मुडी, आशाबाई वामन सुर्यवंशी, वय ७५ रा. पंचेश्वर ता निफाड, यमुना रामदास गांगुर्डे, वय ४० रा. सप्तश्रृंगी गड, विमलबाई अकृत भोई वय ५९ रा. मुडी ता. आमळणेर, प्रमिभा संजय भोई वय ४५ रा. मुडी ता. आमळणेर, जिजाबाई साहेबराव पाटील, वय ६५ रा. मुडी, ज्योती उमेश पाटील, वय २९, रा. खडकशिरपुर ता. विरपुर जि.धुळे संगिता मंगुलाल भोई वय ५६ रा. मुडी, रत्नाबाई ( नाव सांगता आले नाही) रा. मुडी, मुन्सी दगु खाटीक, वय ६८ रा. साक्री ता. जि. धुळे, सुरेखाबाई हिरालाल बडगुजर वय ४३ रा. मुडी ता. आमळणेर, संगिता बाबुलाल भोई वय ६०

Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident News
Cabinet Expansion : फॉर्म्युला फायनल! अजित पवार गटाला मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार 4 मंत्री पदे… शिंदे गटाचे काय होणार?

रा. मुडी ता. आमळणेर, भारगोबाई माधवराव पाटील वय ५२, रा. मुडी हे जखमी झाले आहे. जखमींना घटनास्थळावरुन १०८, १०२, ट्रस्ट व खाजगी अशा आठ ते दहा रुग्णवाहिकेतून वमी ग्रामिण रुग्णालयात आणले यासाठी सप्तशृंग गड, नांदुरी, वणी येथील ग्रामस्थ, समाजिक कार्यकर्ते, ट्रस्ट कर्मचारी, स्थानिक प्रशासन यांनी युद्दपातळीवर मदतीचा हात देवून रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले होते.

वणी ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, वणी डॉक्टर असोसिएशन, १०८ डॉक्टर आदींनी जखमीवर उपचार केले. दरम्यान २२ जखमीपैकी १९ जखमींवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. वणी ग्रामिण रुग्णालयात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केली असून जखमींवर तातडीन जिल्हा रुग्णालयात दाखल करुन वैद्यकिय पथकास उपचाराच्या सुचना दिल्या आहेत.

Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident News

सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत.

गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.

- दादा भुसे

पालकमंत्री नाशिक

Nashik Bus Accident News
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये २४ प्रवाशांसह एसटी दरीत कोसळली! कंडक्टरचा व्हिडीओ आला समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.