Nashik : Travel Busesची पोलिसांकडून काटेकोर चेकिंग ; अग्नितांडवानंतर 1 बस जप्त

Nashik Bus Accident News
Nashik Bus Accident Newsesakal
Updated on

नाशिक : नाशिक -औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुली येथे ८ तारखेला झालेल्या ट्रॅव्हल बस आणि ट्रकमधील भीषण अपघातात १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर ट्रॅव्हल्स बसेसचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्त्यांवर नाकाबंदी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

यावेळी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसची काटेकोर तपासणी केली जात आहे. यात ३१ ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एक बस जप्त करून आरटीओच्या ताब्यात देण्यात आली आहे.(Nashik Bus Accident Strict inspection of travel buses by police 1 bus seized after fire accident nashik news)

Nashik Bus Accident News
Nashik : परवानगी सुलभीकरणासाठी मार्गदर्शन मागविले

औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुली येथे शनिवारी (ता.८) पहाटे साडेचार-पावणे पाचवाजेच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रॅव्हल बस आणि आयशर ट्रक यांच्यात धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली होती.

या दुर्घटनेमध्ये ट्रॅव्हल बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खडबडून जाग आलेल्या शहर पोलिस, महापालिका आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने शहरातील ट्रॅव्हल्स असोसिएशनसमवेत संयुक्त बैठक घेत वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक वा जप्तीच्या कारवाईचा इशारा दिला होता.

Nashik Bus Accident News
Nashik: शिंदे टोल नाक्यावर आजपासून टोल महागला; 20 km आतील नागरिकांसाठी मासिक पास

त्यानुसार, पोलिस आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी रोड जकात नाका, पेठ रोड जकात नाका, शिलापूर टोलनाका, शिंदे - पळसे टोल नाका, नववा मैल मुंबई -आग्रा महामार्ग, गौळाणे फाटा या ठिकाणी रात्रीच्या वेळी नाकाबंदी केली जात आहे.

तसेच, यावेळी खासगी ट्रॅव्हल्स बसेसची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३१ ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करीत ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. एक ट्रॅव्हल्स बस प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ११७ ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी केली.

या कारणांवरून कारवाई

क्षमतेपेक्षा जादा वजन, परवानगीपेक्षा अवैधरीत्या जादा प्रवासी वाहतूक करणे आणि सदोष वाहन चालविणे या प्रमुख कारणांपोटी पोलिस व आरटीओच्या पथकाकडून खासगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Nashik Bus Accident News
MNS News : पदाधिकाऱ्यांच्या हद्दीत ढवळाढवळीला प्रतिबंध

"खासगी ट्रॅव्हल्स चालक, मालकांनी कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाईसह जप्तीची कारवाई केली जाईल."

- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक.

Nashik Bus Accident News
NMC News : दिवाळीपूर्वी 396 नवीन घंटागाड्या रस्त्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.