नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौफुलीजवळ वारंवार अपघात होत असल्याने महामार्गावर फॅनिंग करण्यासह गतिरोधक टाकण्याची मागणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, महापालिकेच्या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर त्याच वेळी गतिरोधक टाकले असते तर खासगी बसला अपघात होऊन १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला नसता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. (Nashik Bus Fire Accident 3 years ago Demand for fanning of highways along with speed breaker Nashik News)
शनिवारी (ता. ८) पहाटे नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौफुलीवर आयशर ट्रकला खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातामुळे बसवर डिझेल सांडून आग लागली. या आगीत बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर केंद्र सरकारपासून तर स्थानिक प्रशासन पातळीवर सर्व शासकीय यंत्रणांनी दाखल घेतली. राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना मदतदेखील जाहीर करण्यात आली.
आता घटना घडल्यानंतर अपघात घडण्यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाले आहे. शासकीय यंत्रणा परस्परांकडे बोटे दाखवत आहे, तर राजकीय पदाधिकाऱ्यांकडून वेगळा तर्क लावून तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याची काम होत आहे. मात्र, या परिस्थितीमध्ये पुरावे सादर न करताच वक्तव्य केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासकीय यंत्रणेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे.
शासकीय पत्रांचा महापालिकेकडून खुलासा
खासगी ट्रॅव्हल बसला अपघात होऊन आगीत होरपळून बारा जणांचा मृत्यू झाल्यानंतर या महामार्गावर गतिरोधक टाकण्याबरोबरच चौफुल्यावर फॅनिंग करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असल्याची टीका केली जात आहे, मात्र महापालिकेने २ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नगरसेवक व नागरिकांच्या पत्राचा संदर्भ देत दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते तारवाला नगर, मोरे मळा चौफुली व मिरची हॉटेल सिग्नल येथे गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती.
त्या संदर्भातील पत्र स्थानिक नगरसेवकांकडून माध्यमांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यातून महापालिकेने तीन वर्षांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून गतिरोधक टाकण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्याची दखल घेतली नाही. आता अपघात झाल्यानंतर महापालिकेला दोषी ठरविले जात असल्याची बाब समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.