Nashik Bus Fire Accident : अपघातानंतरही प्रशासन ढिम्मच!

Bus Fire Accident News
Bus Fire Accident News esakal
Updated on

नाशिक : औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेलची चौफुली अपघाती अग्नितांडवाने होरपळली. पण, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाबींची एकही पूर्तता निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेला अपघाताच्या २४ तासांनंतरही झाली नाही. गतिरोधकांची मागणी सातत्याने होत असतानाही त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शनिवारी पहाटेच्या अपघाताचे मुख्य कारण आहे. गतिरोधक असते तर अपघात टळला असता. (Nashik Bus Fire Accident after accident administration remains silent Nashik News)

नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर शनिवारी (ता. ८) पहाटे आयशर ट्रकला खासगी ट्रॅव्हल बसने धडक दिली. या अपघातातून बसने पेट घेतला आणि बसमधील १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

या घटनेतून या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा असली तरी पहाटेला ही यंत्रणा कार्यान्वित नसते, हे दिसून आले. चौफुलीच्या दिशेने येणाऱ्या चारी रस्त्यावर गतिरोधक असते, तर वाहनांचा वेग मर्यादित होऊन अपघात टळू शकतात. तरीही ना सार्वजनिक बांधकाम विभाग ना महापालिकेने याबाबत दक्षता घेतली.

Bus Fire Accident News
Bus Fire Accident : मिर्ची हॉटेल चौफुलीवर हम्प बसवावा; नागरिकांची मागणी

मिरची हॉटेल चौफुलीवर स्थानिक नागरिकांनी वारंवार गतिरोधक उभारण्याची मागणी महापालिका, शहर वाहतूक पोलिस शाखेकडे केली होती. त्याकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षमुळेच अपघात होऊन १२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येऊन त्याठिकाणी तातडीची उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा स्थानिकांना होती.

परंतु, अपघाताच्या २४ तासांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना या चौफुलीवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच वेगाने या चौफुलीवरून वाहने भरधाव धावत होती. किमान तातडीची उपाययोजना म्हणून याठिकाणी तत्काळ गतिरोधक उभारले जाऊन वाहनांच्या वेगांना मर्यादित करता येणे शक्य होते, अशी रास्त अपेक्षा जागरूक नागरिकांनी आज व्यक्त केली. प्रशासकीय काम धीम्या गतीनेच होते याचा प्रत्यय या गंभीर अपघातानंतरही नागरिकांना आला.

Bus Fire Accident News
Accident : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कळवणला तब्बल अडीच तास रस्ता रोको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()