Nashik Bus Fire: स्फोट झाला अन् प्रवासी चेंडूगत उडाले...

Nashik Bus Accident
Nashik Bus AccidentSakal
Updated on

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा

Nashik Bus Fire : दैव बलवत्तर म्‍हणून वाचलो, अगदी पाच मिनिटांचा अवधी, मोठ्याने आवाज झाला आणि आतील माणसे अगदी चेंडूसारखे उडाले. होरपळून कोळसा झालेले. तसेच बस जागेवरच गरगर फिरली. काही कळण्‍याच्‍या आतच बसने पेट घेतला, अशी जखमी महिलांनी त्‍यांच्या भाषेत सांगितलेली आपबिती.

Nashik Bus Accident
Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

तीन महिन्यांची गर्भवती सुखरूप

मालू चव्हाण (वय ३२) तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत. कारोळा (जि. यवतमाळ) येथून त्या पतीसोबत कामानिमित्त ठाण्याला जाण्यासाठी बसमध्ये निघाल्‍या होत्‍या. पहाटे झोपेत असताना पतीने त्‍यांना उठवले. उठता क्षणी गाडी जागेवरच गोल, गोल फिरल्‍याचे जाणवत होते. त्‍यांच्या पतीने पायाने काच फोडली व खिडकीतून मालू यांना बाहेर काढले व नंतर स्‍वतःही उडी मारली. तसेच पायाला लागल्याने दूर पळणे शक्‍य नसल्‍याने बसपासून थोडे दूर टपरीच्या ओट्याखाली आसरा घेतला व पाचच मिनिटात बसमध्ये स्फोट होऊन आतील माणसे अगदी चेंडूगत उडाली, होरपळून त्यांचा कोळसा झाला होता.

मालू यांना मुकामार लागला. लागलेले बरे होईल; पण ती माणसे जिवानिशी गेली, असे सांगताना त्‍यांना गहिवरून आले. त्‍यांच्या पतीच्या डोक्‍याला व पाठीला मार लागला आहे. मालू यांना डाव्या बाजूच्या छातीला मुका‍मार लागला आहे.

Nashik Bus Accident
Adgaon Bus Fire Accident : ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

जेयतुम्बी पठाण

५८ वर्षे वयाच्या आसपास वय असलेल्‍या जेयतुम्बी पठाण पिंपळनेर (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथून बसमध्ये बसल्‍या होत्या. त्यांना लोकांनी खिडकीतून बाहेर काढले. त्‍यांच्या कंबरेला व हाताला मार लागला आहे.

प्रभा जाधव

५८ वर्षे वयाच्या आसपास वय असलेल्‍या प्रभा जाधव पहाटे गाडीने ब्रेक दाबल्‍यामुळे पुढील सीटवर आदळल्‍याने तसेच गाडीतच पायाला इजा झाली होती. त्‍यांना खिडकीतून बाहेर काढले तेव्हा त्‍या तशाच पडून होत्‍या. त्‍या उठत का नाहीत, म्‍हणून लोकांनी विचारल्‍यावर त्‍यांनी पाय मोडला आहे. मला उठता येत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्‍यांना बाजूला नेण्यात आले.

निकिता राठोड

२६ वर्षांच्या निकिता राठोड मुले व पतीसमवेत नवरात्रासाठी गावी पुसदला गेल्‍या होत्‍या. त्‍यांचे पती महिंद्र येथे नोकरीला आहे. पाच वर्षांचा मुलगा शौर्य व दोन वर्षांची मुलगी स्‍वरा यांच्यासमवेत नाशिकला येत होत्‍या. पहाटेच पतीने उठवत ‘चल लवकर’ म्‍हणत खिडकीची काच तोडली. आधी मुलांना सुखरूप बाहेर काढले व स्‍वतः उडी मारून पत्‍नीला बाहेर काढले. निकिता यांनी उडी मारली. अंधारात पायाखाली काय आहे हे न दिसल्‍याने टाचेला फ्रॅक्‍चर झाले. त्‍यांचे पती ज्ञानदेव राठोड यांनाही मुका‍मार लागला.

Nashik Bus Accident
Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.