नाशिक : नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर गेल्या शनिवारी (ता. ८) पहाटे बस -ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यातील नऊ प्रवाशांची ओळख पटविण्यात येऊन मृतदेह नातलगांच्या स्वाधीनही करण्यात आली. उर्वरित तीन मृतदेहांपैकी दोघांची नावे निष्पन्न झाली असली तरीही त्यातून कोणताही घोळ होऊ नये, त्यामुळे या तीनही मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. या अहवालाची पोलिस आणि जिल्हा रुग्णालयास प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच मृतदेहांची ओळख पटवून नातलगांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.
गेल्या शनिवारी (ता. ८) पहाटे नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर पहाटे साडेचार-पावणेपाचच्या सुमारास आयशर ट्रक व खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने या भीषण आगीत बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतदेह हे अधिक प्रमाणात जळालेली होती. (Nashik Bus Fire Accident Waiting DNA test report of 3 dead bodies Nashik News)
तरीही नातलगांच्या उपस्थितीत पोलिसांनी नऊ प्रवाशांची ओळख पटविली आणि त्यांचे मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. उर्वरित तीन मृतदेहांची अवस्था न ओळखण्याइतपत होती. तरीही नातलगांनी दिलेल्या माहितीवरून दोघांची नावे निष्पन्न झाली. तिसरा मृतदेह न ओळखण्याइतपत जळालेला आहे. त्यामुळे पोलिस आणि जिल्हा रुग्णालय यांनी संगनमताने या तीनही मृतदेहांचे डीएनए नमुने घेत त्याच्या अहवालानंतरच ते मृतदेह नातलगांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, या तीनही मृतदेहांचे डीएनए नमुने घेऊन चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. या मृतदेहांच्या डीएनए नमुन्यांचा अहवाल सोमवारी (ता. १०) सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित होते; परंतु अहवाल प्राप्त न झाल्याने अद्यापही हे तीनही मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आलेले नाहीत. डीएनए अहवालानंतरच मृतदेहांची निश्चित ओळख पटून त्याच नातलगांच्या स्वाधीन केले जातील.
चौघांवर उपचार सुरू
अपघातामध्ये ३७ प्रवासी जखमी झाले होते. यातील ३३ प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, चौघांवर उपचार सुरू आहेत. यातील एकावर आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दोघे जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल असून, एक प्रवासी अशोका-मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
"अपघातातील नऊ मृतदेह त्यांच्या नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तीन मृतदेहांचे डीएनए घेण्यात आलेले आहेत. अहवालानंतर तेही नातलगांच्या स्वाधीन केले जातील. आम्हाला अहवालाची प्रतीक्षा आहे."-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय
"अपघातातील तीन मृतदेहांबाबत साशंकता असल्याने त्यांचे डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नावे निष्पन्न असली तरी त्याच नातलगांच्या स्वाधीन त्या दिल्या जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे डीएनए नमुन्यांच्या अहवालानंतरच नातलगांच्या स्वाधीन केले जाईल."
-इरफान शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.