Nashik News : नांदगाव आगाराच्या एसटीमुळे प्रवाशांना मनस्ताप, दुसरीही जेमतेम 10 किमी गेली

Nashik News : वणी येथे काल बसमधून धूर निघत ती पेटली तर नांदगाव आगाराची कन्नडला जाणारी बस गिअर निकामी झाल्याने कासारीजवळील चांदेश्वरी घाटातच बंद पडली.
Kannada-bound bus from Nandgaon depot stuck in ghat.
Kannada-bound bus from Nandgaon depot stuck in ghat.esakal
Updated on

बोलठाण : वाढत्या उन्हाचा परिणाम परिवहन महामंडळाच्या बससेवेवरही होत असल्याचे दिसत आहे. वणी येथे काल बसमधून धूर निघत ती पेटली तर आज नांदगाव आगाराची कन्नडला जाणारी बस गिअर निकामी झाल्याने कासारीजवळील चांदेश्वरी घाटातच बंद पडली. यानंतर प्रवाशांसाठी आलेली दुसरी बसही जेमतेम दहा किलोमीटरपर्यत गेली अन तीही बंद पडली. (bus from Nandgaon Agar to Kannada stopped at Chandeshwari Ghat near Kasari due to gear failure)

यादरम्यान प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. अखेर गावाजवळील एका हातपंपावर थांबवत जोरदार पाण्याचा फवारा मारल्यानंतर ती थंड झाली अन दोन तासानंतर ही बस मार्गस्थ झाली. एकतर जवळच्या पल्ल्यांसाठी जुनाट बस,त्यातही वाढलेले तापमान यामुळे बस नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे, परिवहन महामंडळाने यात दुरुस्ती करावी आणि लोकप्रतिनिधींनीही यात लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात नांदगाव आगार उत्पन्नाच्या बाबत आघाडीवर असताना कमी पल्ल्यासाठी जुन्या बस वापरण्यात येत असल्याने असे प्रसंग घडत आहेत. गुरुवारी (ता.२३) नांदगाव येथून कन्नडला जाणाऱ्या बस (MH२० B.L ०२१४) निर्धारित वेळेत निघाली. मात्र ही बस कासारी जवळील चांदेश्वरी घाटात असलेल्या अवघड वळणावर गिअर बदलताना क्लोज निकामी झाल्याने गिअर बदलणे शक्य नसल्याने नादुरुस्त झाली.

या बसमध्ये महिला, पुरुष, आबालवृद्ध असे एकूण २५ पेक्षा अधिक प्रवासी होते. चालक/ वाहकांनी नांदगाव बसस्थानकात फोन केला असता प्रवाशांची पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी दुसरी बस (MH४०, N ८६११) आली. परंतु दुसरी बसने देखील प्रवाशांना घेऊन पुढे दहा किलोमीटर अंतरावर नेल अन इंजिन गरम झाल्याने रेडिएटरमधील सर्व पाणी बाहेर पडल्यामुळे बंद पडली. (latest marathi news)

Kannada-bound bus from Nandgaon depot stuck in ghat.
Nashik Lok Sabha Constituency : मतदानाच्या वाढीव टक्क्याचा कल ‘महाविकास’कडे

आधीच त्रस्त प्रवाशांना पुन्हा मनस्तापाला सामोरे जावे लागले. चालकाने ही बस हळूहळू जातेगाव बसस्थानकावर आणून उभी केली असता गाडीचे इंजिन आपोआप बंद पाडले. गावातील एक खासगी बोअरवेल चालू करून मोठ्या प्रमाणात इंजिनवर आणि रेडिएटरमध्ये पाण्याचा मारण्यात आला. इंजिन थंड झाल्यानंतर दुपारी जवळपास साडेतीनच्यादरम्यान म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

नांदगाव आगारात ४७ बस उपलब्ध असून त्यापैकी ९० टक्के गाड्या बारा वर्षांपेक्षा अधिक काळ वापरलेल्या आहे. कित्येक वेळा नांदगाव आगाराच्या बस रस्त्यावर कोठे ना कोठे तरी बंद पडलेल्या बघायला मिळतात. तालुक्यातील या आगाराच्या बस पुणे, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, चाळीसगाव, कन्नड, जालना, शेगांव यासह अनेक लांबच्या पल्ल्याच्या ठिकाणी जातात. सुदैवाने या बस आगारास उत्पन्न देखील चांगले आहे.

Kannada-bound bus from Nandgaon depot stuck in ghat.
Nashik Traffic Rules Break: वाहनांतून धोकादायकरित्या सामानाची वाहतूक! वाहतूक पोलिसांचे दूर्लक्ष; भीषण दूर्घटनेची शक्यता

परंतु दुर्दैवाने खटारा झालेल्या बसमुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील कासारीहून जातेगावकडे जाताना चांदेश्वरी नावाचा तीन किलोमीटर अंतराचा अवघड वळणाचा घाट असून या घाटात चढ्याच्या ठिकाणी अनेकदा डिझेल अभावी, इंजिन गरम झाल्याने तसेच ब्रेक न लागल्याने चालकाच्या सतर्कतेने गाडी दरडीला अडकल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

आमदार लक्ष घालणार कधी?

आमदार सुहास कांदे यांनी तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत, परंतु जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीकडे मात्र त्यांचे लक्ष नाही असे जनतेचे म्हणणे आहे. नांदगाव आणि मनमाड येथील आगाराच्या जुनाट खटारा झालेल्या सर्व बस बदलून आणि दोन्हीही स्थानकावर असलेले स्वच्छतागृह बांधकाम करणे आणि बसस्थानकास किमान रंगरंगोटी करणे बसस्थानक परिसरातील इतर प्रश्न मार्गी लावावेत अशी प्रवासी बांधवांची अपेक्षा आहे.

Kannada-bound bus from Nandgaon depot stuck in ghat.
Nashik Civil Hospital: 'अहो, बॉसने मला नाही ओळखले...मी कालू आहे' गर्दुल्याने केली सिव्हिलमध्ये मोबाईल शुटिंग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.