Bus Accident : कुंदलगाव शिवारात बस उलटली; 8 जखमी

Nashik News : इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कुंदलगाव शिवारात पुण्याहून दोंडाईचाकडे जाणाऱ्या बसचालकाने पावसामुळे अचानक ब्रेक मारले असता, बस उलटून रस्त्याच्या कडेला उलटली.
A bus overturned on the side of the road.
A bus overturned on the side of the road.esakal
Updated on

मनमाड : इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कुंदलगाव शिवारात पुण्याहून दोंडाईचाकडे जाणाऱ्या बसचालकाने पावसामुळे अचानक ब्रेक मारले असता, बस उलटून रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आठ प्रवाशांना दुखापत झाली आहे. (bus overturned in Kundalgaon Shivar 8 injured)

गुरुवारी (ता. ५) दुपारी तीनच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या कुंदलगाव शिवारात पुणे येथून दोंडाईचाकडे जाणारी बस ( एमएच १४, बीटी २३७१)चालकाने पावसामुळे अचानक ब्रेक मारले. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. त्यातील आठ प्रवाशांना हातापायाला आणि डोक्याला मार लागला आहे.

सहा प्रवाशांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन प्रवासी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मालेगावला हलविले आहे. (latest marathi news)

A bus overturned on the side of the road.
Nashik ART HIV Centre : सर्वाधिक HIV उपचार नाशिक एआरटीत! राज्यात अव्वल; 22 गर्भवतींची प्रसुती मात्र बालक अबाधित

या अपघातामध्ये चालक कमलेश पुंडलिक निकम (वय ५०), चैतन्य मनोज शर्मा (वय १७, रा. नंदुरबार), शिवाजी पाटील (वय ६०, रा. कान्हेरे), शोभा रमेश भोई (वय ५७), मीना मदनलाल पुरानी (वय ६०, रा. अहमदनगर).

मीनाबाई शिवाजी पाटील (वय ५०, रा. अमळनेर) मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन जखमी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचतकार्य सुरू केले.

A bus overturned on the side of the road.
Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.