Nashik Citylinc Bus : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनी मार्फत सुरू असलेल्या बस सेवेत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने बसेस चालवली जात असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वेगाला मर्यादा घालण्यात आली आहे. शहरी भागात प्रती तास ६० किलोमीटर तर ग्रामीण भागात प्रती तास ९० किलोमीटर अशी वेगमर्यादा घालण्यात आली असून वेगाचे उल्लंघन केल्यास ऑपरेटर कंपन्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली. (nashik citylinc bus speed limit marathi news)
नाशिक महापालिकेच्या वतीने सिटीलिंक कंपनी स्थापन करून त्या मार्फत शहरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सद्य:स्थितीमध्ये ५६ मार्गांवर २४४ बस धावतात. महापालिकेच्या हद्दीच्या अंतरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी, मोहाडी, सुकेणे, सय्यद पिंप्री, त्रंबकेश्वर, सिन्नर, गिरणारे, सायखेडा या ग्रामीण भागात देखील बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळत आहे. सिटीलिंक बस चालकांकडून वाहन नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे. चालकांकडून वेगाने बस चालवत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याच्या या तक्रारी असून त्या अनुषंगाने सिटी लिंक कंपनीसाठी वाहने चालण्यासाठी वेगाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सहा जानेवारीला महापालिकेला पत्र पाठवले. त्यात शहरी भागात ६० किलोमीटर प्रतितास तर ग्रामीण भागात ९० किलोमीटर प्रती तास वेगाची मर्यादा घालून दिली आहे. नियमांचे पालन झाल्यास ऑपरेटर कंपन्यांना दंड केला जाणार आहे. त्या संदर्भात सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सिटी लिंक कंपनीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे.
या आहेत तक्रारी
मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, सिग्नल जंप करणे, झेब्रा क्रॉसिंगचे नियम न पाळणे, स्पीड ब्रेकरवर वेगाने बस चालविणे, थांबाऐवजी रस्त्यावरच बस थांबविणे, ओव्हरटेक करण्यासाठी दोन बसमध्ये स्पर्धा करणे, वाहतुकीला अडथळा होईल याप्रमाणे बसेस रस्त्याच्या मध्यभागी लावणे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. त्याअनुषंगाने वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.