Nashik CA Exam Result: सीए अंतिम परीक्षेत 128 विद्यार्थी उत्तीर्ण; नाशिकमधून प्रथम अटलचा अव्वल क्रमांक

गेल्या सत्रात मे-जून २०२३ च्‍या तुलनेत निकालात मोठी घसरण झालेली आहे
Pankaj Atal
Pankaj Atalesakal
Updated on

नाशिक : दी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया यांच्‍यातर्फे राष्ट्रीयस्‍तरावर नोव्‍हेंबर २०२३ मध्ये घेतलेल्‍या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. त्‍यानुसार सीए अंतिम परीक्षेत नाशिकचे १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम अटल याने जिल्ह्या‍यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दरम्‍यान, गेल्या सत्रात मे-जून २०२३ च्‍या तुलनेत निकालात मोठी घसरण झालेली आहे. (Nashik CA Exam Result 128 students pass CA final exam First Atals top number from Nashik)

नाशिकमधून सीए अंतिम परीक्षेस दोन्‍ही ग्रुपसह २४१ विद्यार्थी सामोरे गेले. यापैकी २३ विद्यार्थी दोन्‍ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाले असून, पहिला गट पाच, दुसरा गट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४२ आहे.

केवळ पहिला ग्रुप घेऊन परीक्षेला सामोरे गेलेल्‍या २६२ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ दुसऱ्या ग्रुपसह परीक्षेला सामोरे गेलेल्‍या २१५ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

असे अंतिम परीक्षेला सामोरे गेलेल्‍या एकूण ७१८ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्‍यांनी सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्‍वप्‍न साकार केले आहे.

अंतिम परीक्षेत चमकलेले विद्यार्थी

नाशिकमधून प्रथम पंकज अटल याने ५४४ गुण (६८ टक्‍के) मिळवताना जिल्ह्यातून अव्वल क्रमांक पटकावला. रिषभ शिवकुमार डागा याने ५१२ गुण (६४ टक्‍के) मिळवत दुसरा क्रमांक पटकावला.

स्‍वराली सचिन चांदोरकर (५११ गुण) तृतीय, विद्या विजय बडगुजर (५०५ गुण) चौथी आणि सिद्धी केतन गांधी (४९३ गुण) पाचव्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

Pankaj Atal
World Hindi Day 2024 : हिंदी भाषा येत असेल तर 'या' क्षेत्रात करा करिअर, मिळेल चांगली नोकरी आणि भरघोस पगार

निकालात दहा टक्क्‍यांची घसरण

मे-जून २०२३ मध्ये घेतलेल्‍या सीए अंतिम परीक्षेच्‍या निकालात प्रविष्ट ७२२ पैकी १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असताना उत्तीर्णांची टक्‍केवारी २६.१७ अशी होती.

नोव्‍हेंबर २०२३ च्‍या सीए अंतिम परीक्षेच्‍या निकालात दहा टक्क्‍यांपर्यंत घसरण झालेली आहे. या परीक्षेत प्रविष्ट ७१८ पैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णांची टक्‍केवारी १७.८३ अशी आहे.

इंटरमिजिएट परीक्षेत प्रथमेशची बाजी

सीए इंटरमिजिएट या परीक्षेत नाशिकमधून प्रथमेश उत्तम घुगे याने ५६५ गुण (७०.६३ टक्‍के) मिळविताना प्रथम क्रमांक पटकाविला.

भाग्‍येश पारख (५४२ गुण) द्वितीय, लौकिक लोढा (५०५ गुण) तृतीय क्रमांक, हर्ष सांखला (४९७ गुण) चौथा क्रमांक, तर नंदिनी अग्रवाल (४९५ गुण) हिने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

Pankaj Atal
Pune News : ‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय? मग या फेस्टिव्हलची अनोखी संधी चुकवू नकाच !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.