Nashik Police : गावठी कट्टा दिसल्यास पोलिसांना संपर्काचे आवाहन! नाशिक रोड अन उपनगर पोलिस स्टेशनची मोहीम

Nashik News : उपनगर आणि नाशिक रोड पोलिस स्टेशन यांनी सध्या कट्टे विकणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे
Police Alert on Gavthi Pistol
Police Alert on Gavthi Pistolesakal
Updated on

नाशिक रोड : परिसरात सध्या गावठी कट्टे सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येत्या दोन महिन्यांत अनेकांवर कारवाई झालेली असून उपनगर आणि नाशिक रोड पोलिस स्टेशन यांनी सध्या कट्टे विकणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये लोकसहभागही घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Nashik pistol Campaign of Nashik Road upnagar Police Station marathi news)

नाशिक रोडला अरिंगळे मळा, रोकडोबा वाडी, फर्नांडिस वाडी येथील स्वप्नील इमारत, गोरेवाडी, देवळालीगाव, विहितगाव, स्टेशन वाडी, सिन्नर फाटा, उपनगर येथील आम्रपाली झोपडपट्टी, गुलाबवाडी, गुलजारवाडी या भागांमध्ये आजपर्यंत अनेकवेळा कट्टे हस्तगत केलेले आहेत.

कट्टे सापडण्याचे इंगळे मळा, रोकडोबा वाडी, फर्नांडिस वाडी, गोरेवाडी, देवळालीगाव, विहितगाव हे हॉटस्पॉट आहेत. गेल्या दोन महिन्यांत कट्टे सापडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भुसावळ, मध्य प्रदेश, खंडवा, या परिसरातून कट्टे येत असल्याची चर्चा नाशिक रोड परिसरात आहे.

दहशत पसरवणे, फॅशन म्हणून आणि भाईगिरीसाठी गावठी कट्टे बाळगण्याचे फॅड वाढत आहे. अशा गावगुंडांवर कारवाईसाठी सध्या नाशिक रोड पोलिस स्टेशन आणि उपनगर पोलिस स्टेशन अलर्ट आहे. झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंपर्क वाढविण्याबरोबरच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची दत्तक गुन्हेगार योजना सध्या नाशिक रोड परिसरात राबवली जात आहे. (latest marathi news)

Police Alert on Gavthi Pistol
2000 Rupee Notes: दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत; ८,२०२ कोटी रुपयांच्या नोटा येणे बाकी

त्यामुळे कट्टे किंगचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. उपनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि नाशिक रोड पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामदास शेळके यांनी यासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

"गावठी कट्टे बाळगणारे आमच्या रडारवर आहेत. गुन्हेगारी मुक्त वातावरणासाठी लोकसहभाग मिळवत आहोत. कट्टे विकण्यासंबंधी वा कट्टे बाळगणाऱ्या टोळी संबंधी कोणाला माहिती असल्यास त्यांनी उपनगर किंवा नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील."- रामदास शेळके, पोलिस निरीक्षक.

Police Alert on Gavthi Pistol
GST Bill Fraud Alert: जीएसटी बिलासाठी अतिरिक्त पैशांची मागणी? ग्राहकांनो, फसवणूक थांबविण्यासाठी घ्या मदत केंद्राचा लाभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.