Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचारही महागला; व्हेज 150 तर नॉनव्हेज 250 रुपये थाळी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरात येणाऱ्या गाड्यांचे प्रतिकिलो मीटरप्रमाणे दर निश्‍चित झाले आहेत.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरात येणाऱ्या गाड्यांचे प्रतिकिलो मीटरप्रमाणे दर निश्‍चित झाले आहेत. व्हेज जेवण दीडशे रुपयांना, तर नॉनव्हेज जेवण २५० रुपयांना मिळणार आहे. जेवणावळीचे दरही ठरविल्यामुळे प्रचाराचा लवाजमा सांभाळताना उमेदवारांना तारेवरची कसरत कारावी लागणार आहे. रिक्षाला २४० किलोमीटरसाठी ८८० रुपये, तर १२० किलोमीटरसाठी ४४० रुपये दर असेल. (Nashik Campaigning for Lok Sabha election marathi news)

जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा व्हीक्ट्रा, क्वालिस, तवेरा या गाड्यांचे प्रतिदिन २४० किलोमीटरसाठी २७५०, तर १२० किलोमीटरसाठी १३७५ रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या दरात वाढ झाल्याने प्रचारही महागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सर्व खर्चांवर नजर ठेवली आहे. उमेदवाराला प्रत्येक खर्च दररोज निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे.

याकरिता दरही ठरवून देण्यात आले आहेत. निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरची किंमत प्रतिदिन १५ हजार रुपये, लाउडस्पिकर, माईक, अ‍ॅम्पिलीफायरसाठी प्रतिदिन ६ हजार रुपये, ट्यूबलाइट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये, फॅन १३ रुपये, कुलर २५० रुपये, एलईडी टीव्ही ११९५ रुपये यांसह लॅपटॉप, एलईडी व्हॅन, ड्रोन कॅमेरा आदींचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून हा प्रत्येक दर निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या बैठका, कोपरा सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज व्हिडिओ व्ही विंग पथक (व्हीव्हीटी), खर्च निरीक्षक हेदेखील उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि पथकाने नोंदविलेला खर्च याची पडताळणी करणार आहे. उमेदवाराच्या खर्चात हा खर्च मोजला जाणार आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election 2024
Nashik News : शहरात 47 आरोग्यवर्धिनी केंद्रांना अखेर मुहूर्त; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पंचवटीत आज उद्घाटन

फुलांचे दरही ठरले

फुलांच्या हारांचे दरही ठरलेले आहेत. प्रचार आणि मेळाव्यादरम्यान कोणताही उमेदवार अडीच फुटांच्या सफारी हारासाठी १३० रुपये, तर सात त नऊ फुटांच्या हारासाठी ४५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मिनरल वॉटरच्या बाटल्या कंपनीने जाहीर केलेल्या किमतीवर खरेदी केल्या जाऊ शकतात.

पदार्थांचे दर

चहा : सहा रुपये कप

कॉपी : १२ रुपये कप

वडापाव : १२ रुपये

भजी, पोहे, कचोरी, फरसाण : १५ ते २० रुपये

शाकाहारी जेवण : १५० रुपये

नॉनव्हेज थाळी : २५० रुपये

Lok Sabha Election 2024
Nashik News : नाशिकमध्ये हिरवी मिरची आवक घटली; पालेभाज्या दरात सुधारणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.