Nashik News : भुसावळ विभागात 52 हजार तक्रारींचे निरसन; ‘रेल मदत पोर्टल’द्वारे प्रवाशांना दिलासा

Nashik : गैरसोयी/तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी, प्रवाशांना तत्काळ दिलासा मिळावा, यासाठी रेल्वेकडून विविध स्तरांवर काम केले जात आहे.
Rail Help Portal
Rail Help Portalesakal
Updated on

Nashik News : भुसावळ विभागातील विविध रेल्वेस्थानकांवर आणि ट्रेनमध्ये होणाऱ्या गैरसोयी/तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी, प्रवाशांना तत्काळ दिलासा मिळावा, यासाठी रेल्वेकडून विविध स्तरांवर काम केले जात आहे. याशिवाय, भारतीय रेल्वेवरील एकीकृत रेल मदत पोर्टलवर प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान, रेल्वे प्रवासी आपली तक्रार मोबाईल ॲप, वेबसाइट, एसएमएस, १३९ हेल्पलाइन, ई-मेल, सोशल मीडिया आदी सर्व माध्यमांद्वारे रेल मदत पोर्टलवर नोंदवू शकतात. (Cancellation of 52 thousand complaints in Bhusawal section relief to passengers through Rail Help Portal )

रेल मदत पोर्टलवर सर्व प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने प्रवाशांच्या तक्रारी/ समस्या/ शंका यांचे निराकरण जलदरीत्या करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रवाशांना संबंधित गाडीच्या डब्यातील स्वच्छता, आरक्षण, आसनाशी संबंधित समस्या, वृद्ध प्रवाशांसाठी औषधोपचार, प्रवासादरम्यान वैद्यकीय आणि आपत्कालीन मदत यासह अन्य मदत केली जात आहे. (latest marathi news)

Rail Help Portal
Nashik News : प्रथमोपचार प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे निकष नव्याने निश्चित; कामगारांना वेळेत प्रशिक्षणाची तरतूद

गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत भुसावळ विभागाला रेल मदत पोर्टलवर विविध प्रकारच्या ५२.१६६ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यांचे १०० टक्के निराकरण करण्यात आले. सर्व तक्रारी/ समस्या / शंका यांचे सरासरी २४ मिनिटांत निराकरण करण्यात आले. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल २०२४ ते जून २०२४ या कालावधीत भुसावळ विभागाला विविध प्रकारच्या १८. ८३१ तक्रारी रेल्वे मदत पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. सर्व तक्रारी/ समस्या/ शंका यांचे सरासरी १५ मिनिटांत निराकरण करण्यात आले. शंभर टक्के निराकरण करण्यात आल्यावर प्रवाशांकडून अभिप्राय घेतला जातो.

Rail Help Portal
Nashik News : रेशनच्या धान्यावर कोण मारतंय डल्ला? निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोलमाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.