Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीचा मुहूर्त ठरला! दिंडोरी, नाशिकचे उमेदवार 29 ला अर्ज भरणार

Lok Sabha Election : उमेदवारीच्या गोंधळामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार मिळालेला नाही
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : उमेदवारीच्या गोंधळामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार मिळालेला नाही; तर दुसरीकडे महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरविला आहे. येत्या २९ एप्रिलला नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अधिकृतपणे अर्ज दाखल करतील. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवार (ता. २६)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. (nashik Candidates of Nashik and Dindori Lok Sabha constituencies will officially file their applications on April 29 )

चार दिवसांवर उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत येऊन पोहोचली, तरी अजूनही महायुतीचा उमेदवार निश्‍चित झालेला नाही. त्यामुळे दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घ्यावी लागत आहे. महायुतीचा अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, ‘राष्ट्रवादी’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांची वेळ घेऊन एकत्रितपणे अर्ज सादर करण्याचे नियोजन आहे.

परंतु, नाशिकचा उमेदवारच अद्याप निश्‍चित न झाल्याने महायुतीचा प्रचारही थंडावला. नेत्यांमध्ये मरगळ आली असून, कोणालाही उमेदवारी द्या; पण उमेदवार ठरवा, असे आवाहन स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. याउलट परिस्थिती महाविकास आघाडीत दिसून येते. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे व दिंडोरीत भास्कर भगरे यांची उमेदवारी अंतिम केल्याने प्रचारही सुरू आहे.

दोन्ही उमेदवार २९ एप्रिलला शालिमार येथील शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचारफेरी काढतील. त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. नेत्यांची वेळ मिळाली, तर गुरुवारी (ता. २) अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली आहे.  (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : विजय करंजकर अद्याप वेटिंगवरच !

निवडणूक वेळापत्रक

- २६ एप्रिल ते ३ मे २०२४ : उमेदवारी अर्ज दाखल करणे

- ४ मे २०२४ : उमेदवारी अर्जांची छाननी

- ६ मे २०२४ : उमेदवारी अर्ज माघार

- २० मे २०२४ : सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान

प्रमुख नेत्यांच्या सभा

- १५ मे २०२४ : उद्धव ठाकरे यांची सभा

- १६ मे २०२४ : एकनाथ शिंदे यांची सभा

- १७ मे २०२४ : अजित पवार यांची सभा

- १८ मे २०२४ : अमित शहा यांची नाशिकमध्ये सभा

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024: हिरकणी कक्ष, पाळणाघराची 320 केंद्रावर सोय! लोकसभेसाठी 200 अंगणवाडी सेविकांची नेमणूक

२०१९ च्या निवडणुकीची परिस्थिती

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०१९) नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यावेळी १७ लाख ६४ हजार मतदारांपैकी ११ लाख २१ हजार (६४ टक्के) मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावला. यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना ५० टक्के मते मिळाली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात उतरले होते. येथील १७ लाख ३२ हजार मतदारांपैकी ११ लाख ३७ हजार (६५.६४ टक्के) मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावला. डॉ. भारती पवार यांना सर्वाधिक ५० टक्के मते मिळाली होती.

दोन लाख मतदारांची वाढ

नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक पूर्व, पश्‍चिम व मध्य, देवळाली, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर-इगतपुरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. येथील मतदारांची संख्या आता १९ लाख ८३ हजारांवर पोहोचली आहे. संपूर्ण मतदारसंघात एकूण दोन लाख मतदारांची भर पडली. तसेच, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १८ लाख ३० हजारांवर पोहोचली आहे.

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी; आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()