Agniveer Death : देवळालीत तोफगोळ्यांचा स्फोट; 2 अग्निवीरांचा मृत्यू

Agniveer : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्‍चित स्थळी न जाता जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू, तर एक जखमी झाला.
Agniveer (file photo)
Agniveer (file photo)esakal
Updated on

देवळाली कॅम्प : देवळाली आर्टिलरी सेंटरच्या फायरिंग रेंज भागात तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्‍चित स्थळी न जाता जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू, तर एक जखमी झाला. दरम्यान, या दुर्घटनेतील मृत्यू झालेले दोन्ही अग्निवीर सुमारे चार महिन्यांपूर्वी भरती झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. भारतातील अग्निवीरांच्या सरावादरम्यान झालेल्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. (Cannon blast in Deolali 2 agniveer death )

या प्रकरणी देवळाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ११) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १०) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ‘इंडियन शिल्ड गन’ या मैदानावर फायर रेंज आर्टिलरी येथे अग्निवीरांचा सराव सुरू होता. या सरावादरम्यान १२ तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ क्रमांक चारच्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर केल्यावर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर खाली पडला व त्याचा जागीच स्फोट झाला.

Agniveer (file photo)
Agniveer Death : आम्ही सैनिकांमध्ये भेदभाव करत नाही, अमृतपालने...; राजकीय आरोपांदरम्यान लष्कराचं स्पष्टीकरण

या स्फोटात गोहिल विश्‍वराज सिंग (वय २०, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड), शक्कीन शीत (२१, मूळ रा. पश्‍चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड) या दोघांचा जागीच मृत्यू, तर अप्पाला स्वामी (२०) हा जखमी झाला. जखमीवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ११) दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन या दुर्घटनेची माहिती संबंधित लष्करी अधिकाऱ्यांकडून घेतली. दोन्ही मृत्युमुखी झालेल्या अग्निवीरांचे विच्छेदन झाल्यावर त्यांच्या नातेवाइकांना लष्करी सोपस्काराने अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उपनिरीक्षक देवरे अधिक तपास करीत आहेत.

Agniveer (file photo)
Agniveer Scheme Recruitment : बीईजी येथे अग्नीवीर योजने अंतर्गत होणार भरती प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.