झोडगे : उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला झोडगे गावाजवळ भीषण अपघातात ईनोव्हा कार मधील जयश्री संदीप नेरकर वय ४५ यांचे निधन झाले तर पती संदीप दगडू नेरकर वय ५१, मुलगा मानस नेरकर वय २३, मुलगी तनुजा नेरकर वय १८ जखमी झाल्याने मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर शेजारी बसलेले वाहन चालक ज्ञानेश्वर नेश्वर हातळकर यांना किरकोळ दुखापती झाली आहे. अपघात होताच गाडीच्या दोन इअर बॅग उघडल्याने मोठ्या संकटातून गाडीतील प्रवासी बचावले. (Nashik way Ujjain to Nashik car terrible accident near Zodge news)
नाशिक येथील उद्योगजक संदीप नेरकर हे आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी पत्नी व दोन मुलांसमवेत कुलदेवी अन्नपुर्णा माता तसेच ओंकारेश्वर व उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर दि.२३ रोजी रात्री नाशिक कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सतत वाहन चालवून थकलेल्या वाहन चालक ज्ञानेश्वर हाताळकर याला विश्रांती मिळावी म्हणून अपघात स्थळापासून अर्ध्या तासांपूर्वी सदर गाडी संदीप नेरकर यांनी चालवण्यासाठी घेतली होती. (latest marathi news)
मात्र समोर चालत असलेल्या कंटनेरचा वेगाच्या अंदाजन नआल्याने सकाळी ६.३० च्या दरम्यान बेंद्रेपाडा फाटा जवळ झोडगे शिवारातील हाँटेल निवांत समोर कंटेनरला मागून धडक दिल्याने कारचा भीषण अपघात झाला. त्यामुळे दुग्धव्यवसायिकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत करुन रुग्णवाहिकेतून मालेगाव येथे उपचारासाठी नेले असता जयश्री संदीप नेरकर यांना मृत्य घोषित केले. तर परिवारातील तीन सदस्य उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.