Nashik News : बागवानी बोर्ड बनले, बिजेंद्र सिंग लि. कंपनी; मुख्यालय दिल्लीला हलवून शेतकऱ्याऐवजी अडतदारांना सभासद नेमणे चुकीचे

Nashik News : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अख्यातरित असलेल्या ‘नाफेड’ अंतर्गत राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्या अध्यक्षांचीच कारकीर्द संशयास्पद ठरू पाहत आहे.
National Horticultural Research And Development Foundation
National Horticultural Research And Development Foundationesakal
Updated on

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अख्यातरित असलेल्या ‘नाफेड’ अंतर्गत राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राच्या अध्यक्षांचीच कारकीर्द संशयास्पद ठरू पाहत आहे. एकेकाळी ‘नाफेड’चे अध्यक्ष राहिलेले दिल्लीतील माजी आमदार तथा काँग्रेस नेते बिजेंद्र सिंग यांनी केलेले कारनामे आणि बदललेले नियम कसून तपासण्याचे आव्हान ‘नाफेड’च्या कार्यकारी मंडळापुढे आहे. (NAFED News)

देशाच्या अन्न यंत्रणेत कांदा हा अविभाज्य घटक असताना याच प्रश्नावर अनेकदा संसदही स्तब्ध झाली आहे. त्यावर अंकुश आणि देखरेख ठेवण्यासाठी तसेच तेजी-मंदीच्या दरीत समतोल राखण्यासाठी ‘नाफेड’ अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आली आहे. कांद्याच्या बियाण्यांस प्रमाणित करण्याचे काम बागवानी केंद्र करीत असताना दोघांचे अध्यक्ष एकच असा लिखित नियम होता.

परंतु, काँग्रेस नेते बिजेंद्र सिंग ‘नाफेड’चे अध्यक्ष झाले, तेव्हाच ‘एनएचआरडीएफ’ला त्यांनी थेट वेगळे अध्यक्षपद निर्माण केले. याच संशोधन केंद्राने एकेकाळी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे केंद्राने त्यांना अनेक प्रकल्प राबविण्यासाठी दिले. बिजेंद्र सिंग यांची आर्थिक गतिशीलता तेथूनच जोमाने पळू लागली. बागवानी अनुसंधान केंद्रात अधिक उलाढाल व्हावी.

संस्थेचे नाव अजरामर व्हावे आणि परकीय चलन जास्त प्रमाणात देशात यावे म्हणून याचे सभासद महाराष्ट्र आणि गुजरात येथील कांदा निर्यातदार व काही शेतकरी होते. परंतु, बिजेंद्र सिंग यांनी त्यांचा पत्ताच कट करीत दिल्लीच्या आझादपूर मंडीतील काही अडतदार यांची नियुक्ती केली, तीच बेकायदेशीर असल्याचे जाणकार सांगतात. येथूनच घराणेशाहीला प्रारंभ झाला आणि नाशिक मुख्यालय असलेल्या बागवानी केंद्राला दिल्लीसमोर झुकून काम करावे लागले. (latest marathi news)

National Horticultural Research And Development Foundation
Nashik News : शेतकऱ्यांचे मरण स्वस्त होत आहे! 6 महिन्यांत एक हजार 267 जणांनी मृत्यूला कवटाळले

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणारा फायदा आणि मिळणाऱ्या योजनांचा लाभ हळूहळू कमी झाला आणि बिजेंद्र सिंग यांची एक हुकूमत येथे निर्माण झाली. आता कांद्याला हृदयस्थ ठेवणाऱ्या ‘नाफेड’ने मात्र त्याचे बीज प्रमाणित करणाऱ्या ‘बागवानी’वर सिंग यांच्या एकाधिकारशाहीची सखोल चौकशी करून ती संस्था पुन्हा ‘नाफेड’च्या अध्यक्षतेखाली कशी येईल, यावर केंद्राशी तातडीने मंथन करणे गरजेचे आहे.

कोण आहेत बिजेंद्र सिंग?

‘नाफेड’चे माजी अध्यक्ष आणि ‘एनएचआरडीएफ’मध्ये एककल्ली कारभार राबविणारे सिंग हे नवी दिल्ली नागलोई येथून आमदार राहिले आहेत. ते काँग्रेसचे नेते असून, ‘नाफेड’चे अध्यक्ष असताना त्यांच्यावर अनेकदा मोठ्या आर्थिक प्रकरणी गंभीर आरोप झाले. गेल्या सात वर्षांत त्यांनी दिल्लीत मुख्यालय नेल्यावर त्यांच्याच कुटुंबाभोवती महत्त्वाची पदे दिली गेल्याचे बोलले जाते.

सहकारात कारनामे करण्यात माहीर असलेल्या बिजेंद्र सिंग यांनी संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याची रक्कमही रखडून ठेवत ती दिल्लीतील बँकेत जमा केल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली. यावर कुणीही आक्षेप घेतल्यास त्यांना थेट घरचा रस्ता दाखविला जातो. सिंग यांच्या इतरही कामकाजाची चर्चा सतत राजधानीत होत असते.

National Horticultural Research And Development Foundation
Nashik Monsoon Update: पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे म्हाळुंगी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

"चितेगाव येथील मुख्यालय दिल्लीत हलविले; पण काम बंद पडलेले नाही. मुळात माझी त्या वेळी झालेली नेमणूक ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खटकली आणि त्यांनी माझ्याभोवती चौकशीचा ससेमीरा इतर अधिकाऱ्यांना सांगून लावला. मी वेळोवेळी न्यायालयात याबाबत बाजू मांडली असून, त्यामुळे मी येथे काही बोलू इच्छित नाही." - बिजेंद्र सिंग, अध्यक्ष, एनएचआरडीएफ

"मला ‘नाफेड’चे संचालक होऊन एक महिना झाला आहे. याबाबत मी अभ्यास करीत असून, ‘एनएचआरडीएफ’चे महत्त्व माझ्यासारख्या कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्याला ठाऊक आहे. लवकरच केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट घेत विषय मार्गी लावून पुन्हा नाशिक मुख्यालय करू. हा विषय ‘नाफेड’च्या कार्यकारी बैठकीतही मांडणार आहे." - केदा आहेर, संचालक, ‘नाफेड’

National Horticultural Research And Development Foundation
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.