Nashik News : भुजबळ-जरांगे पाटलांच्या 44 समर्थकांवर गुन्हा दाखल! येवल्यातील राडा, रास्ता रोकोप्रकरणी पोलिसांची कारवाई

Latest Nashik News : भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये झालेला राडा आणि रास्ता रोको प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील ४४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Chhagan Bhujbal and manoj jarange patil esakal
Updated on

येवला : येथील शिवसृष्टीबाहेर रविवारी (ता. १३) रात्री छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांमध्ये झालेला राडा आणि रास्ता रोको प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील ४४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Case filed against 44 supporters of Bhujbal Jarange Patil)

१३ ऑक्टोबरच्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला जरांगे पाटील यांनी शनी पटांगणातील सभेपूर्वी नव्याने साकारलेल्या शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले होते. ते येथून सभेसाठी निघून गेल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजीवरून भुजबळ समर्थक व मराठा समाजाच्या युवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी व शाब्दिक युद्ध झाले होते.

त्यानंतर शिवसृष्टीतील स्वयंसेवकांनी माफी मागावी, या मागणीसाठी विंचूर चौफुलीवर तासभर रास्ता रोको आंदोलन जरांगे पाटील समर्थकांनी केले. या वेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक बाजीराव सोनवणे यांनी वेळीच जमावावर ताबा मिळवत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना स्वतः जरांगे पाटील मुक्तिभूमीवरून परतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन समर्थकांना शांततेचे आवाहन केले. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.

रात्री बाराला ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, पेठचे उपअधीक्षक वासुदेव देसले हेही येवल्यात दाखल झाले. अधीक्षक देशमाने यांनी भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ थांबत पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यानंतर शिवसृष्टीला भेट दिली. (latest marathi news)

Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Ratnagiri Election : आयारामांना उमेदवारी दिल्यास राजीनामे देणार; ठाकरे गटाच्या निष्ठावंतांनी ठणकावलं

या राड्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक दिनेश लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गोंधळ, नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन या कलमांखाली ४० ते ४४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात सौरव सोनवणे, गोटू मांजरे, विक्की बिवाल, सचिन सोनवणे, वाल्मीक कुमावत, भूषण लाघवे, नितीन खैरनार, सूरज साळवे, तेजस झाल्टे, झुंजार देशमुख, प्रिया होलबे, प्रवीण कदम, प्रसाद फापाळे, सुशांत फापळे, विक्रम शिंदे, गोपीनाथ ठुबे, महेंद्र देवरे, शुभम धनगे, दाढीवाला योगेश, सचिन आहेर, शुभम परदेशी, श्रीराम साळुंके, सचिन काळे, राहुल आहेर, राकेश फापळे, उत्तम कदम, विजय पठाडे, वाल्मीक मगर, अमोल दाणी व इतर १० ते १५ अशा एकूण ४० ते ४४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन तपास करत आहेत.

अन्याय झाला तर मी पाठीशी : जरांगे पाटील

शांतता ठेवा, कुणाची दडपशाही असेल तर ती मोडून काढायला मी खंबीर आहे. मात्र आपण मोठे भाऊ असून, आपणच असे वागलो तर चुकीचा संदेश जाईल. आपण आपल्या मार्गाने काम करत राहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाचा चांगला दिवस असून, आज आपण शांतता ठेवू या. सर्वांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर हे आंदोलन शांत झाले.

Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Nashik NMC News : महापालिकेच्या जागेवरील दोन झोपडपट्ट्या होणार अधिकृत! नोटिशीद्वारे हरकती, सूचना मागविल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.