Nashik Crime : हॉस्टेल रेक्टरविरोधात गुन्हा दाखल; आत्महत्त्येचे गुढ कायम

Latest Crime News : विद्यार्थीनीने केलेल्या आत्महत्त्येप्रकरणी पालकांच्या तक्रारीनुसार हॉस्टेलच्या महिला रेक्टरविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
suicide
suicide esakal
Updated on

नाशिक : पंचवटीतील के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीने केलेल्या आत्महत्त्येप्रकरणी पालकांच्या तक्रारीनुसार हॉस्टेलच्या महिला रेक्टरविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विद्यार्थिनींच्या आत्महत्त्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून, पोलिसांनी हॉस्टेलच्या हजेरी नोंद रजिस्टर ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. ( case has been filed against hostel rector mystery of suicide continues)

पंचवटीतील के.के. वाघ महाविद्यालयाच्या गिताई हॉस्टेलच्या रुममध्ये शुक्रवारी (ता २०) सकाळी अस्मिता संदीप पाटील (१८, रा. ताहाराबाद रस्ता, बागलाण, जि. नाशिक) हिने गळफास घेत आत्महत्या केली होती. मयत अस्मिताच्या कुटूंबियांनी हाॅस्टेलच्या रेक्टर संशयित उमा पुष्कर हरक व संस्था, खासगी प्रशासनाविरोधात गंभीर आरोप करीत तक्रार केली. त्यानुसार, पंचवटी पोलिसात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मयूर निकम करीत आहेत.

suicide
Nashik Crime News : म्हसरूळला 3 हजार किलो चंदनाचे लाकूड जप्त! मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाड मात्र गायबच

दरम्यान, याप्रकरणी पालकांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केले. त्यानुसार पोलिसही चौकशी करीत आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही ठोस माहिती लागलेली नाही. अस्मिता ही डिप्लोमाच्या दुसर्या वर्षांला शिक्षण घेत होती. तसेच दोन दिवसांपूर्वीच ती आई-वडीलांना गावी भेटून हॉस्टेलला आली होती. नेमक्या कोणत्या कारणातून तिने टोकाचे पाऊल उचलले याचा शोध पोलीस घेत आहेत.

''विद्यार्थिनींच्या आत्महत्त्येसंदर्भात ठोस माहिती मिळालेली नाही. पालकांच्या तक्रारीनुसार तपास सुरू आहे. तथ्य आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.''- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

suicide
Nashik Crime News : डीजेचा दणदणाट भोवणार! तीन गुन्हे दाखल; आणखी कारवाईची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.