Nashik Crime : माजी आमदार दराडेंची तोतयागिरी; गुन्हा दाखल

Latest Crime News : पोलिस ठाण्यात तोतयागिरी केल्याचा व राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police Action on Crime
Police Action on Crimeesakal
Updated on

नाशिक : विधान परिषदेचे माजी आमदार व शिवसेनेच्या उबाठा गटाचे नरेंद्र दराडे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात तोतयागिरी केल्याचा व राष्ट्रीय चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दराडे यांचा आमदारकीचा कालावधी गेल्या जून महिन्यातच संपुष्ठात आलेला आहे. असे असतानाही त्यांनी आमदार असल्याचे भासवून शासकीय अधिकार्यांवर पत्रान्वये दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. ( case of impersonation of former MLA Darade has been registered )

अंबादास जगन्नाथ खैरे (रा. छत्रपती संभाजीनगर नाका, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कालावधी २१ जून २०२४ रोजी संपुष्ठात आलेला आहे. असे असताना, माजी आमदार दराड यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सदरील पत्र हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता देण्यात आले असून, त्या पत्राद्वारे दराडे यांनी विद्यमान आमदार असल्याचे भासविलेले आहे.

Police Action on Crime
Nashik Crime : हॉस्टेल रेक्टरविरोधात गुन्हा दाखल; आत्महत्त्येचे गुढ कायम

पत्रावर स्वत:च्या नावासमोर सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य असा शिक्का आणि त्यावर सही देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे, या पत्रावर विधान भवनाचे प्रतिक व मध्यभागी राष्ट्रीय चिन्ह वापरलेले आहे. असे वापरणे सर्वसामान्यांना परवानगी नसताना दराडे यांनी मात्र त्याचा वापर केलेला आहे. यातून दराडे यांनी आमदार नसताना पत्रव्यवहार करणे, शासकीय अधिकार्यांवर दबाव आणणे तसेच, ते पत्र स्वत:च त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्रामध्ये सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब गंभीरस्वरुपाची असल्याने याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण हे तपास करीत आहेत.

'‘लेटरहेड’ कोणी नेले असावे. त्यावरील सही मात्र माझी नाही. राजकीय सुडाबुद्धीतून सदरील गुन्हा दाखल झाला आहे. त्या पत्राशी माझी काहीही संबंध नाही.''- नरेंद्र दराडे, माजी आमदार.

Police Action on Crime
Nashik Crime News : पोलिसांनी आवळल्या रोडरोमिओंच्या मुसक्या! मुलींची छेड काढणाऱ्यांची वरात काढणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.