Nashik CBI Raid : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाअंतर्गत असलेल्या मुंबई, नाशिकमधील पासपोर्ट सेवा केंद्रांशी संबंधित या केंद्राचे सहायक, दलाल यांच्या भ्रष्टाचारप्रकणी ३२ संशयितांविरोधात १२ गुन्हे दाखल केले आहे. यासंबंधित मुंबई, नाशिकमधील ३३ ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली. (Nashik CBI raids in case of corruption in Passport)
सीबीआयने पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठांसह १४ अधिकाऱ्यांवर १२ गुन्हे दाखल केले आहेत. लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्राचे पासपोर्ट (पीएसके) सहाय्यक आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाअंतर्गत कार्यरत पीएसके, लोअर परेल, मुंबई आणि पीएसके मालाड, मुंबई येथे नियुक्त केलेल अधिकारी, पासपोर्ट सुविधा एजंट हे संगनमताने भ्रष्टाचार करीत होते.
अपुऱ्या, अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करण्याच्या बदल्यात किंवा पासपोर्ट अर्जदारांच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये फेरफार केले जात होते. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने संशयिताचे फोन आणि कार्यालयीन फोनचे तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्यामुळे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाल्याचे समजते. (latest marathi news)
संशयित अधिकारी, पासपोर्ट सुविधा देणारे दलाल यांच्या संगनमताने थेट त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यांमध्ये किंवा त्यांच्या जवळच्या सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये पासपोर्ट सुविधा दलालांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवत असल्याचेही उजेडात आले आहे. याच अनुषंगाने सीबीआयच्या पथकाने गेल्या बुधवारी (ता. २६) मुंबईसह नाशिकमधील संशयित अधिकारी व दलालांच्या ३३ ठिकाणी छापे टाकत संशयास्पत दस्तऐवज जप्त केल्याचे सीबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.