Nashik News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला केलेल्या प्रत्येक फळ हे अक्षय मिळते असे मानले जाते. त्यामुळे प्रामुख्याने या दिवशी गुंतवणूक, खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. अक्षयतृतीयेचे औचित्य साधत नाशिककरांनी सोने खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली. (Celebrating Akshaya Tritiya Nashikers thronged markets to buy gold)
दुपारचे रणरणते ऊन अन् सायंकाळी पावसाच्या आगमनाने काहीकाळ बाजारात धावपण झाली मात्र अक्षयतृतीयेला सोने खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह कायम होता असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळेच या दिवशी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते.
शुक्रवारी (ता. १०) २४ कॅरेट सोन्यासाठी भाव ७२ हजार ९०० रुपये तर २२ कॅरेट सोन्यासाठी ६६ हजार ५०० रुपये इतक्या भावाने नागरिकांनी सोन्याचे दागिन्यांची खरेदी केले. तसेच चांदीला ८४ हजार रुपये प्रतिकिलो इतका भाव होता. मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी केल्याने अनेक सराफी पेढ्यांवर एकच झुंबड उडाली.
ग्राहकांची विशेषतः हार, ब्रेसलेट, सोनसाखळी, बांगड्या, कानातील झुमके, गंठण, अंगठ्या, विविध दागिने आदी दागिन्यांना मागणी होती. तर गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी सोन्याचे बिस्कीट, नाणे, वेढा खरेदी केले. (Latest Marathi News)
अक्षयतृतीयेनिमित्त यावेळी अनेक सराफी व्यावसायिक यांच्याकडून सोने घडवळीवर भरघोस सूटही देण्यात आली होती. अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोने- चांदीच्या बाजारपेठांमध्ये कोटींची उलाढाल झाल्याची माहिती, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
"ग्राहकांसाठी विविध स्कीम ठेवण्यात आल्या होत्या. या स्कीमचा लाभ घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. दुपारी ऊन अन् सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्राहकांची थोडी धावपळ झाली तरी सोने खरेदीचा उत्साह अन् आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसून आला." - संकेत वडनेरे, संचालक, वडनेरे सराफ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.