Dasara Festival: शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन विजयादशमीचा उत्सव! सप्तशृंगगडावर सकाळी ग्रामस्थ- भाविकांकडून कीर्तिध्वजाचे दर्शन

Latest Dasara Festival 2024 News : येथे न्यायालयाचे निर्देश व बोकड बळीसंदर्भात निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मोजक्याच प्रतिनिधी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत बोकड बळी दिल्यावर पूर्णाहुती देण्यात आली.
Trust President Balasaheb Wagh, Executive Officer Bhagwan Nerkar, Mankari Gangurde, Gram Panchayat Member Rajesh Gawli etc. during the completion of Shatchandi Yagas in Adimaye's temple hall.
Trust President Balasaheb Wagh, Executive Officer Bhagwan Nerkar, Mankari Gangurde, Gram Panchayat Member Rajesh Gawli etc. during the completion of Shatchandi Yagas in Adimaye's temple hall.esakal
Updated on

वणी : आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सावाची शनिवारी (ता. १२) विजयादशमीस शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन सांगता करीत दसरा उत्सव साजरा करण्यात आला. दुसरा टप्पा येथे न्यायालयाचे निर्देश व बोकड बळीसंदर्भात निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मोजक्याच प्रतिनिधी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत बोकड बळी दिल्यावर पूर्णाहुती देण्यात आली. (Celebration of Vijayadashami at Saptshring gad)

सप्तशृंगगडावर आदिमायेच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तिध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी-पाटील कुटुंबीयातील सदस्यांनी कीर्तिध्वज फडकविल्यावर शनिवारी सकाळी कीर्तिध्वजाचे सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शुक्रवारी (ता. ११) महानवमीनिमित्त देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी सहाला शतचंडी यागाची सुरुवात करण्यात आली होती.

या वेळी पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी यज्ञविधीत सहभाग घेतला. मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात मंत्रघोष होऊन यज्ञविधी झाला. सकाळी सप्तशृंगीदेवीच्या सुवर्ण अलंकारांची ट्रस्ट कार्यालयापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी सातला देवीची महापूजा करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांनी सपत्नीक श्री सप्तशृंगी देवीची महापूजा केली. शुक्रवारी सालाबादप्रमाणे अश्र्विन महानवमीस सप्तशृंगगडावर सायंकाळी सहाला शतचंडी याग व होमहवनास पुरोहितांच्या मंत्रोच्चरात प्रारंभ झाला. (latest marathi news)

Trust President Balasaheb Wagh, Executive Officer Bhagwan Nerkar, Mankari Gangurde, Gram Panchayat Member Rajesh Gawli etc. during the completion of Shatchandi Yagas in Adimaye's temple hall.
Nashik Dasara Property Shopping: दसऱ्याच्या मुहूर्तावर 900 फ्लॅटचे बुकिंग! परवडणाऱ्या घरांकडे ग्राहकांचा कल; फार्महाऊसला मागणी

यागास शनिवारी सकाळी दहाला ट्रस्टचे अध्यक्ष वाघ व बोकडबळीचे मानकरी तुकाराम गांगुर्डे यांनी पूर्णाहुती देऊन दसऱ्याचा अद्‌भूत सोहळा पार पडला. बोकड बळीच्या विधीवत पूजेसाठी सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायत प्रतिनिधी, विश्वस्त संस्था व परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूर्तता केली.

या वेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रतिनिधी, ध्वजाचे मानकरी गवळी-पाटील परिवार सदस्य, प्रशासनाचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. पूर्णाहुती झाल्यावर सर्व मानकरी, उपस्थित विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आदिमायेची आरती करण्यात आली. सकाळी घटी बसलेल्या स्थानिक महिला भाविकांनी कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन आदिमायेस नैवेद्य देऊन बसविलेले घट विसर्जित केले.

दुपारी देवीस पूरणपोळी, वरण, भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य देऊन नैवेद्य आरती होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. या वेळी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील आलेल्या तब्बल २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Trust President Balasaheb Wagh, Executive Officer Bhagwan Nerkar, Mankari Gangurde, Gram Panchayat Member Rajesh Gawli etc. during the completion of Shatchandi Yagas in Adimaye's temple hall.
Nashik Dasara Shopping : दसरामुळे वाहन बाजार तेजीत! 150 कोटींची उलाढाल; इलेक्ट्रॉनिक वाहनांना सर्वाधिक पसंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.