Nashik Central Assembly Constituency : संविधान बदलाच्या चर्चेने मतदारांनी साधला ‘मध्य’

Central Assembly Constituency : अल्पसंख्याकांची नाराजी, संविधान बदलाच्या चर्चेने मतदार एकवटल्याने भाजपच्या गडास तडा गेला.
Assembly Constituency
Assembly Constituency esakal
Updated on

Nashik Central Assembly Constituency : अल्पसंख्याकांची नाराजी, संविधान बदलाच्या चर्चेने मतदार एकवटल्याने भाजपच्या गडास तडा गेला. एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या पारड्यात पडले. विशेष म्हणजे हिंदू मतदार एकत्रित करण्याचा महायुतीच्या प्रयत्नाने मध्य नाशिकमध्ये मशाल पेटली. नाशिक मध्य मतदारसंघात कमी प्रमाणात मतदान झाले. ८८ हजार ७१२ मतदारांनीच आपला हक्क बजावला. हिंदू, मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार मिश्रित मतदारसंघ आहे. ( efforts of Mahayuti win in central Nashik )

हिंदू मतांचे एकत्रीकरणाचा महायुतीचा प्रयत्न असफल झाला. दलित मतदान संविधान बदलाच्या चर्चेच्या मुद्यावर एकवटले तर मुस्लिम मतदार प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. एकूण मतदानात या दोन समाजातील मतदारांचा टक्का अधिक असल्याने भाजपच्या गडास भेदण्यास महाविकास आघाडीस यश आले. सर्वत्र मशाल धगधगत राहिली. मध्य मतदारसंघात विकासाऐवजी जात, धर्म या मुद्यावरच निवडणूक केंद्रित झाली.

मध्य मतदारसंघात हिंदू मतदारांचा आकडा मोठा असला तरी हिंदू मतांचे विभाजन महायुतीच्या अपयशाला कारणीभूत ठरले. एकूण मतदानापैकी जवळपास ५८ हजार मुस्लिम मतदान झाले. महायुतीला आलेल्या अपयशाने मध्य नाशिकमध्ये भाजपला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. मतदानाच्या दिवशी आजी-माजी आमदारांमधील वाददेखील महायुतीचे मतदान घटविण्यास कारणीभूत ठरला. (latest marathi news)

Assembly Constituency
Nashik Assembly Constituency : उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला; कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी पैजा लागल्या

यशाची कारणे

- मुस्लिम, दलित एकगठ्ठा मतदान.

- उद्धव ठाकरे सहानुभूती.

- महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब.

अपयशाची कारणे

- उमेदवारी विलंबाने घोषित.

- जुने नाशिकमध्ये प्रचाराकडे दुर्लक्ष.

- मध्य मतदारसंघात ठराविक भागात प्रचार

- पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव.

Assembly Constituency
Nashik Assembly Constituency : मध्य विधानसभा मतदारसंघात धोक्याची घंटा! महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.