Nashik Central Jail : नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांना कुटुंबातील लहान मुलांसाठी प्रत्यक्ष भेटण्याची संधी गळाभेट या अभिनव उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आली. आपले लहान मुल भेटून त्यांच्यासोबत काही वेळ घालविल्यामुळे चेहऱ्यावर आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एकूण ८५ बंदिवानांची जवळपास मुले-मुली व नात यांची गळाभेट घडवून त्यांच्यातील मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ( Opportunity for detainees to meet younger family members)
या उपक्रमास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. आय. लोकवाणी, कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संतोष खारतोडे, तुरुंग अधिकारी डी. बी. बेडवाल, सीता हांडे आदी उपस्थित होते. मध्यवर्ती कारागृहामार्फत लहान मुलांना गोड जेवण व शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. रक्ताच्या नात्यातील सदस्यांना भेटण्यासाठी बंदिवान व त्यांची लहान मुलांमध्ये मोठा उत्साह व आनंद जाणवत होता.
अक्षरश काही मुले तर नटूनथटून आली होती. अठरा वर्षाच्या आतील मुले- मुली व नात- नातू व सहा वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांच्यासोबत एक कुटुंबातील सज्ञान व्यक्तीसमवेत गळाभेट हा उपक्रम सकाळी दहा ते दुपारी अडीचपर्यंत घडवून आणण्यात आला. रुसवे, फुगवे, आनंद, उत्कटता या सर्व प्रकारच्या भावभावना बघायला मिळाली. पप्पा, बाबा तुम्ही काळजी घ्या, आम्ही काळजी घेतो, तुम्ही लवकर या शाळेत जा मोठे व्हा अशा भावनिक संवादाने कारागृहाच्या तटबंदीनाही पाझर फुटला होता.
''नियमितपणे आपल्या कुटुंबातील मुलांची बंदिवानांबरोबर भेट होत राहिली तर एकमेकांची चेहरा ओळख ही कायमस्वरूपी होते. असे उपक्रम नियमितपणे राबविले जावे. यामधून नात्यांमधील असलेला दुरावा राहणार नाही. यामुळे बंदिवानांमध्ये निश्चितच डिप्रेशन येणार नाही. गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.''-एम. आय. लोकवाणी, जिल्हा सत्र न्यायाधीश
''अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बंदिवानांमध्ये एकटेपणाची जाणीव निर्माण होऊ नये, आपल्या मागेही कुणीतरी आहे, मुलांना भेटल्यामुळे निश्चितच त्यांच्या आयुष्यात जगण्याची उभारी येते म्हणून सदर कार्यक्रम आयोजित केला गेला.''- अरुणा मुगुटराव, कारागृह अधीक्षक
कारागृहाचे दायित्व
कारागृहातील कारखान्यात काम करून मिळालेल्या उत्पन्नातून एक बंदिवान दोन हजार रुपये घरी मनीऑर्डर घरी करीत होता. त्याला कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांनी विचारले असता, मनीऑर्डर का करतो तर त्याने उत्तर दिले, की मुलगा बारावीला आहे म्हणून पैसे जमवतो. कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गळाभेट उपक्रमाच्या दरम्यान स्वयंस्फूर्तीने शैक्षणिक साहित्याचे वाटप लहान मुलांना वयोगटांनुसार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.