Nashik News : मालेगावात रोज होतेय चाय पे चर्चा; पण राजकारणाची नव्हे तर वैयक्तिक फायद्याचीच

Nashik News : मालेगाव आणि चहा यांचे अतूट नाते आहे. शहरातील गल्ली मोहल्ल्यासह मुख्य रस्त्यावर चहाच्या हॉटेल्स, गाडा, टपरी, कॅन्टीन, फिरते चहा विक्रेते दिसतात.
Customers chatting at a tea shop in Malegaon
Customers chatting at a tea shop in Malegaonesakal

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव आणि चहा यांचे अतूट नाते आहे. शहरातील गल्ली मोहल्ल्यासह मुख्य रस्त्यावर चहाच्या हॉटेल्स, गाडा, टपरी, कॅन्टीन, फिरते चहा विक्रेते दिसतात. काही चहा दुकानाच्या परिसरात शेकडो खुर्च्या लावलेल्या असतात. वेगवेगळ्या विषयावर गप्पा करत चहाचा घोट घेणे ही जणू काही येथील दिनचर्याच झाली आहे, त्यामुळे शहरभर रोज येथे चाय पे चर्चा रंगत असते. (Chai with discussions are happening daily in Malegaon)

चहा विक्रीतून येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. मालेगावकरांच्या जीवनातील चहा हे आवडीचे पेय बनले आहे. कामाचा ताण, थकवा, रोजची सवय ही गरम चहाच्या स्वादातून एका घोटातून थकवा दूर होतो. पहाटे उठल्यापासून चहाची सुरवात होते, ती मध्यरात्री उशिरापर्यंत येथील चहाची दुकाने सुरू असतात. शहरातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय, मजूर वर्ग, लूम, हातगाडा.

फिरते व्यावसायिक, मार्केट, मोठ - मोठी दुकाने, शो रूम, शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, साचा चालक अशा सर्वच ठिकाणी चहासाठी नेहमी गर्दी पाहायला मिळते. येथील यंत्रमाग कारखान्यांच्या परिसरात तर चोवीस तास चहा मिळत असतो. शहराच्या पूर्व भागात दिवसभर चहाची सर्वाधिक उलाढाल होते.

चहाच्या प्रकारात पिवर दुधाचा चहा, चॉकलेट मसाला, कोको, ब्लॅक टी, लेमन टी असे प्रकार पाहायला मिळतात. एक कट चहा ग्लासची किंमत ७ रुपये आहे. हे शरिरासाठी एनर्जी बूस्टर आहे असे वाटते. काही व्यक्ती चहा पिण्यासाठी प्रसिद्ध चहा दुकानांवर जातात. (latest marathi news)

Customers chatting at a tea shop in Malegaon
Nashik NMC : महापालिकेच्या वर्षभरातील सेवांचे मूल्यमापनाचा निर्णय; राज्यसेवा हक्क आयोगाच्या सूचना

यातच एकात्मता चौकातील कॉलेज मैदानातील सुपर टी, दोस्ती स्टॉलवरच्या चहाची बातच निराळी आहे. या स्टॉलवर नेहमी चहा पिण्याची हाऊसफुल गर्दी पाहायला मिळते. बरेच चहाप्रेमी आपल्या कामाची सुरवात देखील सुपर टी स्टॉल ला भेट देऊनच करतात असे चित्र पहावयास मिळत आहे.

चहाची पसंतीची ठिकाणे

शहरातील प्रत्येक ठिकाणचा चहाचा गोडवा वेगवेगळा आहे. बस स्टँडजवळील मीनारा टी स्टॉल, मिलन हॉटेल, मोसमपुलावरील तुफान हॉटेल, साहेब टी स्टॉल, साठ फुटी जवळील पाटील कॅन्टीन, मोतीबाग नाका भगवती, सटाणा नाका येथील शिवम हॉटेल, रावळगाव नाका पहिलवान हॉटेल, राजू टी स्टॉल असे अनेक पसंतीच्या ठिकाणी जाऊन नागरिक आपली चहाची तलफ पूर्ण करतात. तेजी असो वा मंदी मालेगावच्या चहा व्यवसायावर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

"सुपर टी स्टॉल गेल्या वीस वर्षांपासून नागरिकांना चहाचा स्वाद देत आहे. नागरिक वेगवेगळ्या ठिकाणांहून चहा घेण्यासाठी येतात. गप्पा, विचारांचे देवाण घेवाण, सुख दुःख हे चहा घेताना बोलत असतात. इथे आल्याने चहा पिणाऱ्यांना उत्साह, आनंद मिळतो. या व्यवसायातून आमचा उदरनिर्वाह भागत आहे." - गोकूळ गवळी, सुपर टी स्टॉल मालक, मालेगाव

Customers chatting at a tea shop in Malegaon
Nashik News : वटार सर्पदंश प्रकरणी 2 डॉक्टर निलंबित; जिल्ह्यात सर्पदंशाच्या 834 लस उपलब्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com