Nashik Chain Snatching Crime : म्हसरुळ परिसरात पुन्हा चैन स्नॅचिंग; शहरात 17 दिवसात 5 घटना

Chain Snatching Crime : महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी खेचून नेली.
Chain Snatching Crime
Chain Snatching Crimeesakal
Updated on

Nashik Chain Snatching Crime : पेठरोडवर सोसायटी परिसरात बिस्किटचा पुडा घेऊन घरी जाणार्या महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी खेचून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या १७ दिवसात पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सोनसाखळी खेचून नेल्याच्या पाच घटना घडल्या असून, म्हसरुळ हद्दीतील दुसरी घटना आहे. (Chain snatching again in Mhasrul area )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.