NAFED News : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीचे गौडबंगाल उघडकीस!

Nashik News : ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी केंद्रांवर अचानकपणे छापा टाकत खरेदीतील गौडबंगाल उघडकीस आणले.
Chairman of NAFED raids onion buying centers in Nashik district
Chairman of NAFED raids onion buying centers in Nashik districtesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी गुरुवारी (ता. २०) सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी केंद्रांवर अचानकपणे छापा टाकत खरेदीतील गौडबंगाल उघडकीस आणले आहे. थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याऐवजी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांद्याची खरेदी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Chairman of NAFED raids onion buying centers in Nashik district)

त्यामुळे या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी घेतल्याने खरेदीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, भाजपची सत्ता असलेल्या विधानसभा मतदारसंघात छापा पडल्याने भाजपला ‘घरचा आहेर’ मिळाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाने (नाफेड) चालू वर्षी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

‘नाफेड’ने थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त दर मिळेल आणि खरेदीचा उद्देश यशस्वी होईल, याउद्देशाने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या संस्था कांद्याची खरेदी करतात. केंद्र सरकारच्या आदेशाने गेल्या वर्षी सात लाख टन कांद्याची खरेदी करूनही कांद्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच रडवले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सडकून पराभव झाला.

त्यामुळे शेतकऱ्याची नाराजी दूर झालेली नसल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी गुरुवारी अचानकपणे चांदवड व देवळा तालुक्यांतील सहा खरेदी केंद्रांवर छापा टाकला. येथे थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे ‘नाफेड’चा फायदा शेतकऱ्यांना नाही, तर व्यापाऱ्यांना होत असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी ज्या ठिकाणी भेट दिली त्या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. (latest marathi news)

Chairman of NAFED raids onion buying centers in Nashik district
Nashik News : जलतरण खेळाडू सरावापासून वंचित; राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल बंदच!

माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेरदेखील ‘नाफेड’चे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्यात तालुक्यांतील खरेदी केंद्रांना भेट देत ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी भाजपला घरचा ‘आहेर’ तर दिला नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार असल्याचे जेठाभाई अहिर यांनी स्पष्ट केल्यामुळे चौकशीअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

काय प्रकार घडला

‘नाफेड’च्या कांदा खरेदीबाबत अनेकदा तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा तर थेट पंतप्रधानांच्या सभेतही गाजला. त्यामुळे ‘नाफेड’च्या अध्यक्षांनी अचानकपणे खरेदी केंद्रांना भेट दिली. विक्री केलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडावूनमध्ये साठवल्याचे आढळले. काही शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून ‘नाफेड’कडून पैसे वसूल केले जातात. बऱ्याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे आढळून आले आहे.

छापासत्रातील धक्कादायक बाबी

- आधारकार्डवर शिक्के मारून ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात गडबड

- शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांकडूनच कांद्याची खरेदी

- ‘नाफेड’च्या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे उघड

- कांदा खरेदीत दलाली झाल्याने शेतकऱ्यांना फटका

- फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडूनच खरेदी

- थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात उतरून कांदा खरेदी करण्याचा विचार करण्याचे विचाराधीन

- बाजार भावापेक्षा कमी दराने कांद्याची खरेदी

- कांदा खरेदीची चौकशी समिती लवकरच नाशिकमध्ये येणार

Chairman of NAFED raids onion buying centers in Nashik district
Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.