Nashik News : संबळच्या आवाजात रंगतोय बोहडा; 300 वर्षांची परंपरा

Nashik News : टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला.
Bohada Festival
Bohada Festivalesakal
Updated on

चांदोरी : टीव्ही व संगणक युगाने माणसाच्या मनोरंजनाची संकल्पनाच बदलली. हा बदल होत असताना याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रथा, परंपरांना बसला. बदलाच्या लाटेत अनेक उत्सवांचे स्वरुप बदलले. या तंत्रज्ञानाच्या युगात एक यशस्वी लोककला परंपरा या बोहडा महोत्सवामुळे समोर आली. चांदोरी येथे अनेक वर्षांची बोहड्याची परंपरा पुन्हा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली. (Nashik News)

यावर्षी वरच्या आळीस असलेला बोहडा महोत्सव उत्तरोत्तर रंगत आहे. रामायण महाभारतातील विविध दृश्य बरोबर विविध नकला अभिनय यांचा संगम पाहायला मिळतो आहे. २७ जुलैपर्यंत महोत्सव चालणार आहे. महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पंच कमिटी प्रयत्नशील आहे. चांदोरीस बोहडा महोत्सवात परंपरेनुसार अनेक पात्र साकारले जात आहे. याचे चित्रीकरण अनेक युवक आपल्या मोबाइलमध्ये करताना दिसत आहे.

सोंगासह नकला, तमाशाही

बोहाड्यामध्ये देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे विविध मुखवटे चेहऱ्यावर धारण करून सोंगे घेतली जातात. नृत्य व युद्धप्रसंग सादर केले जातात. संबळ या वाद्यांच्या तालावर गावातील देवी मंदिर परिसरात वरच्या आळीत मिरवणूक काढली जाते. मध्यंतरीच्या काळात मनोरंजनासाठी तमाशाही असतो. चांदोरीचा १५ जुलैपासून सुरू झालेला बोहडा दररोज रात्री आठपासून सुरुवात होत असून, ते मध्यरात्री उशिरापर्यंत रंगतो आहे. (latest marathi news)

Bohada Festival
Nashik Police Transfer : बदल्यांनी ‘कहीं खुशी... कहीं गम’! बदल्या करून आयुक्त आठवडाभर सुट्टीवर

कला सादर करण्यासाठी युवकांचा उत्साह

चांदोरी येथे सुरू असलेल्या बोहडा महोत्सवात युवक ही सहभागी होत आपली आवड जोपासताना दिसत आहे. विविध पात्रांच्या वेशभूषा करत संबळ वाद्यांवर नृत्य करत करत आहे. आपल्यातील दिव्यांगाचा बाऊ न करता ३ फूट उंची असलेल्या ३८ वर्षीय गणेशने वय वर्षे ५ असलेल्या शिवांश सोबत नृत्य करत ग्रामस्थांची वाहवा मिळविली.

बोहडा महोत्सवास सारजा गणपतीने सुरुवात होत असून, त्यात वैशिष्ट्य म्हणजे मुलींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज अर्पिता गोराडे या सारजा, तर साई मोरे गणपती बनत आपला सहभाग नोंदवित आहे.

Bohada Festival
Nashik Water Shortage : दीड महिना उलटूनही कसमादेतील धरणे कोरडीठाक! पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com