Nashik News : गोष्ट एका ‘रेशनकार्ड’ची! तहसीलदारांच्या समयसूचकतेने वाचला रुग्णाचा जीव

Nashik News : ढोमसे कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. ६) नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रेशनकार्डची आवश्यकता असून, रेशनकार्ड उपलब्ध करण्यासंदर्भात विनंती केली अन...
Ration Card
Ration Cardesakal
Updated on

चांदोरी : पंचकेश्वर येथील वामन ढोमसे यांनी नाशिक येथील साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. त्यांना पाच ब्लॉकेजेस असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याबद्दल कल्पना दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाऊ शकते, याबद्दल माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडे रेशनकार्ड नव्हते. रेशनकार्ड नसल्याने कुटुंब सैरभैर झाले होते. (Nashik chandori patient life saved by ration card marathi news)

ढोमसे कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. ६) नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रेशनकार्डची आवश्यकता असून, रेशनकार्ड उपलब्ध करण्यासंदर्भात विनंती केली. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तत्काळ रेशनकार्ड तयार करून रुग्णाचा मुलगा सचिन ढोमसे यांच्या ताब्यात दिले. रेशनकार्ड जमा केल्यानंतर सायंकाळी वामन ढोमसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

यापूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजना उत्पन्नाची मर्यादा असलेल्यांनाच लागू होती. त्यामुळे इतर कागदपत्रांसह उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासत होती. सुधारित योजनेत सर्वच कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचारांचा खर्च दिला जात आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यात नागरिकांना एक रुपयाही रोख भरावा लागत नाही. कारण आयुष्मान योजनाही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे. (Latest Marathi News)

Ration Card
Nashik News : शिक्षण नसतानाही प्रशिक्षणाने घडविल्या उद्योजिका! मोलमजुरीच्या कामातून मुक्तता

लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड, शिधापत्रिका, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो

"डॉक्टरांनी ॲन्जिओप्लास्टी करण्यासाठी सूचना केल्यानंतर खर्च पाहून पोटात गोळा आला. मात्र, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तत्काळ सकाळी रेशनकार्ड उपलब्ध करून दिल्याने सायंकाळी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली."

-वामन ढोमसे, पंचकेश्वर

"प्रशासनात काम करताना शेवटच्या घटकाला योग्य न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल. कुणाचीही विनाकारण अडवणूक केली जाणार नाही."

-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

Ration Card
Nashik Police : शनिवारपासून ‘मॉर्निंग वॉक विथ पोलिस’! पोलिस आयुक्तांची संकल्पना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.