Nashik Lok Sabha Constituency : बावनकुळे, महाजनांचा ठाकरेंवर हल्लाबोल! राजकीय चिखलफेकीने गाठले टोक

Lok Sabha Constituency : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीष महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टिका केली.
Girish Mahajan, Chandrashekhar Bawankule
Girish Mahajan, Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीष महाजन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टिका केली. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माध्यम प्रतिनिधींजवळ केलेल्या राजकीय चिखलफेकीने टोक गाठल्याचा प्रत्यय आला. (Nashik Chandrashekhar Bawankule and Girish Mahajan criticize Uddhav Thackeray)

माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सर्व नेते हरलेल्या मनस्थितीत आहे. ज्यावेळेस हरलेली मनस्थिती होते. त्यावेळी चुकीची विधाने करतात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले नसते व काँग्रेससोबत गेले नसते तर त्यांना नैराश्य आले नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित नसलेली चूक उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एका विशिष्ट समाजाची मते हवी असल्याने भगव्या ध्वजाला ठाकरे आता फडके म्हणतात. मताच्या राजकारणासाठी आपल्या उंचीपेक्षा अधिक ते बोलत आहेत.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे ज्या मागण्या केल्या त्या नक्की पूर्ण होतील असा दावा बावनकुळे यांनी केला. शरद पवार यांना बारामतीत गल्लोगल्ली फिरावे लागले. त्यामुळे ते बारामतीत हरतील असा दावा बावनकुळे यांनी केला. (latest marathi news)

Girish Mahajan, Chandrashekhar Bawankule
Nashik Lok Sabha Election : नाशिकमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सामना! 'या' मुद्द्यांमुळे गोडसेंना निवडणूक जड जाणार

पायाखालची वाळू घसरली

राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी टिका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या पायाखालची वाळु घसरत असल्याने ते काहीही बोलतात, अशी टिका माध्यमांजवळ केली. ते काहीही बोलतील मात्र त्यांच्या या बोलण्याला उत्तर देणे आमचं दायित्व नाही.

पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. दहा वर्षात मोदी यांनी भारताचा काय विकास केला हे जगाने पाहिले. जो माणूस दोन वर्ष घराच्या बाहेर पडला नाही व मंत्रालयाची पायरी चढली नाही तो माणूस विकासाच्या गप्पा मारतो हे हास्यास्पद असल्याचे महाजन म्हणाले .

Girish Mahajan, Chandrashekhar Bawankule
Nashik Lok Sabha Election : राजकीय पदाधिकार्‍यांची पोलिसांकडून ‘कोंडी’; गुन्हेगारांसह राजकीय पदाधिकार्‍यांना तडीपारच्या नोटीसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.