सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या डॉ. राहुल आहेर यांना भाजपच्या पहिल्या यादीत महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली. डॉ. राहुल आहेर यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय पक्षाला कळविला होता तरीही त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिली आता त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेत जाताना विरोधकांपेक्षा कुटुंबातूनच विरोधाची जास्त शक्यता आहे.
दादांनी नानांच्या नावाची शिफारस करूनही पक्षाने दादांना उमेदवारी दिली. आता पक्षश्रेष्ठी नानांना कसे शांत करतात यावर निवडणूकीचा निकाल अवलंबून असेल. डॉ. आहेर यांना महाविकास आघाडीचे तगडे आव्हान यावेळी असणार हेही तितकेच खरे आहे. (Chandwad Deola Assembly challenge before dr Aher)