Dam Water Storage : चणकापूर 226, हरणबारीत 128 दशलक्ष घनफूट जलसाठा वाढला; शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : मालेगाव व बागलाण तालुक्यात आतापर्यंत ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसल्याने चिंता वाढली. विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला आहे.
Dam Water Storage
Dam Water StorageSakal
Updated on

मालेगाव : तालुक्यासह ‘कसमादे’त पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांमधील जलसाठ्यात वाढ होत नव्हती. दोन दिवसांपासून विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चणकापूरमध्ये तब्बल २३० दशलक्ष घनफूट, तर हरणबारीत १२८ दशलक्ष घनफूट जलसाठा वाढला आहे. चणकापूर व गिरणा धरणात अत्यल्प पाणी असल्याने मालेगाव महापालिकेला ऐन पावसाळ्यात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. (Dam Water Storage)

धरणांमधील साठा वाढू लागल्याने मत्स्य व्यावसायिकांचा जीवही भांड्यात पडला आहे. दरम्यान, मालेगाव परिसरात गुरुवारी (ता. २५) ढगाळ वातावरण असूनही पावसाने गुंगारा दिला. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला, तरीही ‘कसमादे’त पुरेसा पाऊस झाला नाही. जेमतेम पेरणीयोग्य पाऊस झाला आहे.

मालेगाव व बागलाण तालुक्यात आतापर्यंत ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसल्याने चिंता वाढली. विविध पाणीपुरवठा योजनांनी ताण दिला आहे. एरवी जुलैमध्ये पूरपाण्याने विविध पाणीपुरवठा योजनांची तहान भागत होती. दोन दिवसांपूर्वी चणकापूर, हरणबारी, केळझर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, धरणांमधील साठा वाढण्यास मदत झाली आहे.

मालेगाव शहर व तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. सोमवारी (ता. २२) दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाने मात्र दडी मारली. तालुक्यातील २४ गावे व ५७ वाड्या अशा एकूण ८१ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २७ टँकरच्या माध्यमातून ४१ फेऱ्या केल्या जात आहेत. तालुक्यातील ६५ हजार ९५३ नागरिकांची तहान आजही टँकरच्या पाण्याने भागत आहे. एकूणच तालुक्यासह ‘कसमादे’ परिसर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (latest marathi news)

Dam Water Storage
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

‘कसमादे’तील धरणांतील सध्याचा साठा (दशलक्ष घनफूटमध्ये)

धरण - साठवण क्षमता - उपयुक्त साठा - टक्केवारी

चणकापूर - २४२७ - ३४७ - १४.३०

हरणबारी - ११६६ - २३३ - १९.९८

केळझर - ५७२ - ४९ - ८.५७

नागासाक्या - ३९७ - ०० - ००

गिरणा - १८५००- २१७३ - ११.७५

पुनद - १३०६ - ६५४ - ५०.०८

माणिकपुंज - ३३५ - ० - ०

Dam Water Storage
Nashik Potholes : नाशिक रोड परिसरात खड्डेच खड्डे; वाहनधारकांची कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.