Nashik News : अवैध तस्करी रोखण्यासाठी राज्य सीमांवर ‘चेकपोस्ट’; ‘आयजी’च्या आदेशानुसार सीमांवर कसून तपासणी

Nashik : नाशिक परिक्षेत्रातील ग्रामीणसह धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांच्या सीमा परराज्याला लागून असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध तस्करीची शक्यता वाढली आहे.
 Check Post
Check Postesakal
Updated on

Nashik News : नाशिक परिक्षेत्रातील ग्रामीणसह धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांच्या सीमा परराज्याला लागून असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध तस्करीची शक्यता वाढली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क असून, अवैध धंदे रोखण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्या आदेशान्वये आंतरराज्य सीमेवर चेकपोस्ट उभारले आहेत. ( Check Post on state borders to prevent illegal smuggling )

या चेकपोस्टवर पोलिसांनी आत्तापर्यंत तीन कोटी तीन लाख २७ हजार १२२ रुपयांचा अवैध मद्यसाठा, प्रतिबंधित गुटखा व अमली पदार्थांचा साठा जप्त करीत अवैध तस्करीला ‘चाप’ लावला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. पाटील यांच्या आदेशानुसार, नाशिक ग्रामीणसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्टवर २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

गुजरात सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १२, धुळे पोलिसांनी दोन व नंदुरबार पोलिसांनी दहा गुन्हे दाखल करीत ४० लाख ६९ हजार ४६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तर गुटखा तस्करीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी आठ व नंदुरबार पोलिसांनी सहा गुन्हे दाखल करीत एक कोटी १३ लाख सात हजार ८९८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. मध्य प्रदेशाच्या सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी जळगाव व धुळे पोलिसांनी प्रत्येकी दोन-दोन आणि नंदुरबार पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करीत ६६ लाख ७ हजार ६८ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

 Check Post
Nashik News : मालेगावी प्लास्टिक बंदी नावालाच! सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर

मध्य प्रदेशाच्या सीमेवर अवैध मद्य तस्करी प्रकरणी जळगाव व धुळे पोलिसांनी प्रत्येकी दोन-दोन आणि नंदुरबार पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करीत ६६ लाख ७ हजार ६८ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तर गुटखा तस्करी प्रकरणी पाच गुन्हे दाखल करीत ३७ लाख ४३ हजार ५९६ रुपयांचा गुटखा जप्त केला. अमली पदार्थ प्रकरणी तीन गुन्हे दाखल करीत ४५ लाख ९९ हजार १०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. जळगाव पोलिसांनी सीमेवर दोन कारवायांमध्ये दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

५५ चेकपोस्ट

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गुजरात व मध्य प्रदेशातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत आंतरराज्यीय समन्वय बैठक झाली. या बैठकीत तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात एकूण ५५ चेकपोस्ट उभारले आहेत. धुळे जिल्ह्यातील गुजरात सीमेलगत तीन, मध्य प्रदेश सीमेलगत सहा चेकपोस्ट तसेच नंदुरबार जिल्ह्यात गुजरात सीमेलगत सर्वाधिक २१ व मध्य प्रदेश सीमेलगत पाच, नाशिक ग्रामीणमधील गुजरात सीमेलगत १३, जळगाव जिल्ह्यात मध्य प्रदेश सीमेलगत सात चेकपोस्ट उभारले आहेत.

''सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारले असून, तेथे सीसीटीव्ही बसविले आहेत. तसेच, व्हिडिओ शूटिंग केली जात आहे. महिनाभरात मध्य प्रदेशमधील २०, गुजरातमधील २४ गुन्हेगारांविरोधात वॉरंट बजावून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तसेच चोरट्या मार्गांचा अवलंब होऊ नये, यासाठी गस्ती व नाकाबंदी कठोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत.''- डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

 Check Post
Nashik News : सप्तशृंगगडावर भेसळयुक्त मिठाई विक्रीचा पर्दाफाश! 5 विक्रेत्यांवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.