Chhagan Bhujbal : सामाजिक हेतूने कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थांसाठी आरक्षित जागा खुल्या करण्याचे कटकारस्थान सध्या सुरू आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक संस्थांनी काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. (nashik Chhagan Bhujbal statement of Institutions should work for skilled education marathi news)
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस तथा नामको बँकेचे संचालक हेमंत धात्रक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात शुक्रवारी (ता. १५) झालेल्या या कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर, सल्लागार राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, प्रजेनजीत फडणवीस, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गिते, बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, जयवंत जाधव, सत्कार समितीचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, की संस्था, बँक, व्यवसाय, शेती सांभाळत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे धात्रक यांसह चांगल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. मंत्री डॉ. भारती पवार यांनी श्रम, संयम, सकारात्मक विचार, विकासाची दृष्टी असेल, तरच पुरस्कार प्राप्त होतात. हेमंत धात्रक यांच्यात हे सर्व गुण असल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)
सत्कारास उत्तर देताना धात्रक यांनी मुंबई, पुणेपाठोपाठ नाशिकचा विकास होत नसल्याची खंत व्यक्त केली. नाशिकला मुंबई-पुण्याच्या स्पर्धेत आणण्यासाठी काम झाले पाहिजे. कुटुंबाकडून सत्कार होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. गोसावी, डॉ. करमाळकर, डॉ. काळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
अॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले. गुरुमित बग्गा यांनी मानपत्राचे वाचन केले. जयंत ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. नितीन ठाकरे यांनी आभार मानले. नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, झुंबरलाल भंडारी, के. के. वाघ संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, शैलेश गोसावी, महेश दाबक, अजित सुराणा, हेमंत देशपांडे, हेमलता बिडकर, प्रा. विजय सोनवणे, तानाजी जायभावे, बाळासाहेब गामणे आदी उपस्थित होते.
तुम्ही नव्हते म्हणून बॅंक बुडाली
मंत्री भुजबळ यांनी भाषणात नामको बँक सुस्थितीत आणली. मात्र, शेतकऱ्यांच्या बँकेचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा बँकेच्या दुर्दक्षेची स्थिती सांगितली. जोपर्यंत सातशे कोटी दिले जाणार नाहीत, तोपर्यंत बँक उभी राहणार नाही. येवल्यात अनेक कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांना बुडवायचे कसे, एवढेच माहीत असल्याचे भुजबळ यांनी सांगत, बँकेवर चांगल्या माणसाची गरज असल्याचे सांगितले.
दोन महिन्यांत उपकेंद्र सुरू
दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र दोन ते तीन महिन्यांत सुरू होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. या उपकेंद्राच्या भरभराटीसाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.