Nashik News : नाशिक ते पुणे रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. तत्पूर्वी, भूसंपादनाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आढावा बैठक घेत, राज्य सरकारला त्याविषयी माहिती सादर केली. (Nashik-Pune Railway)
नाशिक- पुणे रेल्वेमार्गाची घोषणा होऊन अनेक वर्षे झाली, तरी प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झालेला नाही. भूसंपादनाचे काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला. मध्यंतरी रेल्वेमार्गच बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला. लोकसभा निवडणुकीनंतर आता अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद आले आहे.
त्यांना नाशिक- पुणे रेल्वेमार्गाचा विषय पूर्ण ज्ञात असल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याबरोबरच देशात मोदी सरकार आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे नियोजित रेल्वेमार्ग पुन्हा गतिमान पद्धतीने सोडविला जाणे शक्य आहे.
त्याच दृष्टीने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पथक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील भूसंपादनाच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १९) आढावा जाणून घेतला. त्यांनी सविस्तर माहिती संकलित केल्याचे वृत्त आहे. (latest marathi news)
‘शिर्डी’कडून रेल्वे वळविण्याचा प्रस्ताव
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा अहमदनगर, शिर्डीमार्गे वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात बोगद्यांचे प्रमाण कमी राहणार असल्याने खर्चात बचत होईल, असे त्यांचे म्हणणे होते.
त्या दृष्टीने अंतिम सर्वेक्षणाचे निर्णय घेणे आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून हे काम वेगाने सुरू करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.