CM Eknath Shinde : ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स : मुख्यमंत्र्यांचे आदेश

Nashik News : ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

Nashik News : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून, ठाण्याप्रमाणे नाशिकमध्येही डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, परवानगीशिवाय अधिक आकाराचे होर्डिंग उभारले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Chief Minister Instructions to create Disaster Response Force in Nashik)

दुष्काळी परिस्थिती व मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २८) ऑनलाइन स्वरूपात घेतला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित होते.

प्रारंभी रेल्वे, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांसारख्या यंत्रणांनी सादरीकरण केले. पावसाळ्यात कॉलरासारखे जलजन्य आजार डोके वर काढतात. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध राहतील याची दक्षता घ्या, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या. यंदा सरासरीहून अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (latest marathi news)

CM Eknath Shinde
Nashik District Hospital : सिव्हिल, कारागृहातील खाबूगिरी पुन्हा चर्चेत!

पाणी सोडण्याची वेळ आलीच तर पूरजन्यस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी सर्वांना विश्वासात घ्या, अशा सूचना करण्यात आल्या. पावसाचा, हवामानाचा अंदाज देणारे सचेत, दामिनी, मोसम यांसारख्या अॅपचा शेतकऱ्यांकडून वापर वाढावा यासाठी जनजागृती करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

मुंबईत होर्डिंग कोसळल्याने अनेकांनी जीव गमावला. या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग कुठल्याही परिस्थितीत लावले जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या.

CM Eknath Shinde
Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.