Nashik News : सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे आरोग्य, पंचायत, शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभागामधील तालुकास्तरीय तसेच क्लस्टरमधील अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ७५ अधिकाऱ्यांना बालविवाह निर्मूलन चँपियन्स प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या आदेशान्वये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. (Child Marriage Eradication Champion training 75 officers in district )