Online Gambling : ऑनलाइन गेमिंग, सट्टा, जुगाराचे अनेक ॲप्लिकेशन्स मोबाईलमध्ये उपलब्ध असतात. जाहिरातीच्या माध्यमातून किंवा मित्रांच्या सांगण्यावरून तरुण, तसेच शालेय विद्यार्थी पालकांच्या नकळत ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकत चालली आहेत. सुरवातीला खेळायला सुरवात केल्यावर लगेचच पैसे मिळतात म्हणून भविष्यात चांगले मिळतील, या आशेपोटी मुलं नकळत त्यात फसली जात आहेत. (Nashik Children in craze of online gambling news)
महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतलेल्या एका तरुणाला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली. नकळत ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद लागला आणि नोकरीपेक्षा जुगारात चांगले पैसे मिळतात म्हणून पर्मनंट नोकरी सोडून दिली. कर्जबाजारी झाल्यामुळे घरचे त्रस्त झाले. आज तो तरुण मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेत आहे.
ही एक केस झाली; पण अशी असंख्य उदाहरणं आहेत जे ऑनलाइन जुगाराला पैसे मिळण्याचे माध्यम समजत आहेत. एका सर्वेक्षणानुसार ११ ते १६ वयोगटांतील ३१ टक्के शालेय विद्यार्थी पालकांच्या नकळत पॉकेटमनीचा उपयोग ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी करतात. आई-वडील नोकरी करतात, अभ्यासासाठी मोबाईलचा वापर अनिवार्य झाल्याने विद्यार्थी पालकांच्या नकळत ऑनलाइन जुगार, गेमिंग खेळत आहेत.
ॲप कसे गुंतवून ठेवतात...
कोणतेही ॲप्लिकेशन, वेबसाइट ओपन केल्यावर गॅम्बलिंगच्या (जुगार) भरमसाट जाहिराती दिसतात. सिनेक्षेत्रातील अभिनेते, क्रिकेटर्स ॲपच्या जाहिराती प्रमोट करताना दिसतात. मुलांचे ते रोलमॉडेल असल्याने मुलांना त्याचे आकर्षण होते. कॅसिनोमध्ये जुगारातून लाखो रुपये मिळतात. तीच पद्धत या ॲपमध्ये वापरली जाते.
ड्रीम इलेव्हन ॲपमध्ये लाखो रुपयांची रक्कम एका मिनिटात लागते. त्यामध्ये खेळाडूकडून ॲप एक फी स्वत: घेतात. राहिलेली रक्कम विजेत्याला देतात. परंतु ॲपचे अल्गोरिदम त्यांच्याच बॉटसला (नियंत्रण ठेवणारे) विजेते घोषित करतात. त्यातून पूर्ण पैसे त्या ॲपला मिळतात.
एका वेळी १०० गेम चालू असताना त्यात एक-दोन ठिकाणी मोठ्या बक्षिसांमध्ये हे बॉटस हात साफ करत असतात, हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नाही. रम्मीमध्ये (पत्यांचा खेळ) असाच प्रकार केला जातो. जिंकत आलेले असताना गेम कधी चेंज केला जातो ते खेळणाऱ्याला कळत नाही. (Latest Marathi News)
कॅसिनोमध्ये टेबलवर डीलर्स अफरातफर करण्यात माहिर असतात. तीच पद्धत आता अल्गोरिदम आणि बॉटस शिताफीने वापरतात. कोणतेही ॲप, वेबसाइट, सोशल मीडिया वापरताना जुगार खेळले जाणाऱ्या ॲपच्या सतत नोटिफिकेशन येत असतात.
अमूक माणूस इतकी रक्कम जिंकला, त्याचे अनुभव, नवीन ऑफर, नवीन गेम यामुळे माणूस नकळत त्यात ओढला जातो. सुरवातीला फ्री कॉइन्स पैसे दिले जातात आणि हळूहळू सवयीचे रूपांतर व्यसनात होते. वापरकर्त्याला प्रलोभन दाखवून सतत व्यस्त ठेवणे हा ॲप्लिकेशन्सचा मुख्य भाग असतो.
सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाही
"शालेय विद्यार्थ्यांची सद्सदविवेकबुद्धी विकसित झालेली नसते. काय योग्य अन् काय अयोग्य त्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. सगळ्याच गोष्टी आयुष्यात मनासारख्या घडत नाही. थांबण्याची वृत्ती, संयम मुलांमध्ये कमी होताना दिसतो. नकार पचवून घेण्याची वृत्ती मुलांमध्ये राहिली नाही. भावनिक व्यवस्थापन पालकांनी, मुलांनी शिकणे गरजेचे आहे."
- डॉ. मृणाल भारद्वाज, उपप्राचार्या, मानसशास्त्र विभागप्रमुख (सोबत फोटो आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.