सिडको : मागील गेल्या काही महिन्यांपासून सिडको परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त असताना विशेष म्हणजे एकही लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिडको, अंबड, चुंचाळे, कामटवाडे, खुटवडनगर, पवननगर, उत्तमनगर, शिवाजी चौक, गणेश चौक, उपेंद्रनगर, अंबर वजन काटा आदी भागांमध्ये काही महिन्यांपासून नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र या समस्या सोडवण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींबाबत संतप्त भावना व्यक्त होताना दिसत आहे. (Nashik Cidco residents suffering from problems)
लोकसभा निवडणुकीचा बाऊ करून जो तो आचारसंहितेचे कारण दाखवून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यामध्ये विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींसोबत मनपा प्रशासन अधिकारी व इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न काही करता सुटताना दिसत नाही. बहुतांश परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
तर काही ठिकाणी पाणी येणेच बंद झाले आहे. काही ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपावर आली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याची समस्या तर नेहमीचीच झाली आहे. काही विशिष्ट प्रभागांमध्ये मात्र पाण्याचा सर्रास अपव्यय होताना दिसून येतो. तर काही परिसरामध्ये भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन फिरताना महिला दिसतात.
दुसरीकडे विजेच्या समस्येलाही सिडकोवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करणे, वेळी अवेळी वीज जाणे, वीज मंडळाच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी फोन न उचलणे, तसेच थातूरमातूर कारण देऊन सहा ते आठ तास लाइट बंद ठेवण्याच्या प्रकारामुळे नागरिक पूर्ण त्रस्त झाले आहेत.
तसेच वर्षभरापासून एमएनजीएनल गॅस पाईपलाईनसाठी ९० टक्के रस्ता बाजूने खोदला आहे. या ठिकाणी मातीचे ढिगारे दिसतात. काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी मुरूम पडल्याचे दिसून येत आहे. काम झाल्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण होणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले दिसत नाही. (latest marathi news)
त्यामुळे रस्त्याची पार वाट लागलेली आहे. आता पावसाळा देखील येत आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचा पूर्ण चिखल होणार आणि दुचाकी निसटण्याची शक्यता होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या घरासमोरच हा प्रकार झाल्याने नागरिकांच्या दारासमोर चिखलाचे साम्राज्य होणार आहे.
तसेच काही खड्डे न बुजल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भले मोठे कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. त्यामुळे काम पूर्ववत होणे आवश्यक आहे. डास, मच्छर, माशा व रात्रीच्या किड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धूर फवारणी नित्याची होणे आवश्यक आहे. मात्र संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याची कोणीही हिंमत करताना दिसत नाही. त्यामुळे ठेकेदाराचे फावताना दिसत आहे.
आचारसंहितेचे कारण
महापालिका व सरकारी कार्यालयात गेल्यानंतर आचारसंहितेचे कारण देऊन काम करण्यास टाळाटाळ करताना सिडको विभागीय कार्यालय, सिडको प्रशासन कार्यालय व इतर कार्यालयामध्ये हीच बोंबाबोंब दिसून येत आहे दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी आचारसंहितेच्या काळात आंदोलन, मोर्चे केल्यास आमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.
अशी भीती व्यक्त करताना दिसत आहे. ॲड. मनोज आहेर, अंकुश शेवाळे, सचिन महाजन, सागर दातीर, प्रणव पाटील, अक्षय परदेशी, हर्षल चव्हाण, रवी वाघ आदींसह विविध परिसरातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.