Nashik Cidco Shootout Case : अखेर फिर्यादी गुंड शिर्केलाही अटक; कोयते बाळगून दहशत

Crime News : सिडकोतील अंबड लिंकरोडवरील जीएसटी कार्यालयासमोर तीन दिवसांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडून गोळीबाराची घटना घडली.
Shootout Case
Shootout Caseesakal
Updated on

Nashik Cidco Shootout Case : सिडकोतील अंबड लिंकरोडवरील जीएसटी कार्यालयासमोर तीन दिवसांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडून गोळीबाराची घटना घडली. यातील फिर्यादी असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराविरोधात कोयता बाळगून दहशत पसरविल्याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन कोयते जप्त केले आहेत. (Nashik Cidco Shootout Case news)

वैभव ऊर्फ गिल्या गजानन शिर्के (२३, रा. कामटवाडे गाव), वेदांत ऊर्फ दादू आनंद गिरी (१८, रा. कामटवाडे गाव) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. रविवारी रात्री (ता.७) सिडकोत सराईत गुन्हेगार असलेल्या वैभव शिर्के व दर्शन दोंदे यांच्या टोळ्यांमध्ये भडका उडाला होता.

त्यातून दोंदे याने शिर्केवर गावठी कट्ट्यातून ‘फायर’ केले होते. त्यावेळी दोन्ही टोळ्यांमधील संशयितांच्या हातांमध्ये तलवारी, कोयते असल्याचे पोलिसांनी हस्तगत केलेल्या सीसीटीव्हीतून समोर आले. याप्रकरणी संशयित शिर्के याच्या फिर्यादीनुसार दर्शन दोंदे व त्याच्या साथीदारांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा अंबड पोलिसांत दाखल झाला.

पोलिसांनी दोंदेसह सहा संशयितांना अटकही केली. तर, वैभव शिर्के याच्याही हातामध्ये कोयता असल्याचे सीसीटीव्हीतून समोर आल्यानंतर अंबड पोलिसांनी संशयित वैभव व त्याचा साथीदार वेदांत यांच्याकडून दोन कोयते जप्त करीत त्यांच्याविरोधात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघनप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक केली आहे.   (latest marathi news)

Shootout Case
Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

उशिराने सुचलेले शहाणपण

रविवारी (ता. ७) रात्री गोळीबाराची घटना घडली. सोमवारी (ता.८) पहाटे दोंदे टोळीच्या सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. सराईत गुन्हेगार वैभव शिर्केच्या फिर्यादीनुसार दोंदे टोळीविरोधात गुन्हाही दाखल झाला. परंतु या घटनेप्रसंगी कोयता बाळगून दोंदे टोळीवर चालून जातानाचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होऊनही शिर्केविरोधात गुन्हा दाखल करण्याची तत्परता पोलिसांनी दाखविली नव्हती.

अखेर दोन दिवसांनी पोलिसांना शहाणपण सुचले अन्‌ शिर्केविरोधात गुन्हा दाखल केला. संशयित दोंदे व शिर्के हे दोघेही सराईत गुन्हेगार असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. परंतु राजकीय वरदहस्तामुळे अद्यापपर्यंत त्यांच्या स्थानबद्धतेची वा मोक्काची कारवाई पोलिसांकडून झालेली नाही, असा आरोप होत आहे.

तडीपार गुंडाला अटक

चुंचाळे शिवारातील महापालिकेच्या शाळेसमोरून तडीपार केलेल्या सराईत गुंडाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण राजेंद्र कोळी (२३, रा. चुंचाळे शिवार) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून कोयता जप्त केला. तसेच, चुंचाळे परिसरातून सतरा वर्षीय युवकाकडून तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

Shootout Case
Baramati Crime News : बारामतीत सोन्याचे दागिन्यांच्या चोरीने नागरिक चिंताग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()