Nashik News : पावसाने ओढ दिल्याने सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उदभवली आहे. त्यामुळे कडवा धरणातून तात्काळ आवर्तन सोडण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्यअभियंता जलसंपदा विभाग यांना केल्या. त्यामुळे आज सायंकाळी ७ वाजता कडवा कालव्यास पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश मुख्यअभियंत्यांनी दिले आहेत. (Nashik News)
कडवा लाभक्षेत्राच्या भागात विशेषतः सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात अद्यापही पुरेसा पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांची पिके तर जळत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. मागील वर्षी राज्यशासनाने सिन्नर तालुका १०० टक्के दुष्काळी घोषित केला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप तालुक्यात पुरेसा पाऊस नाही.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहे. पाणी योजनांचे तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कडवा धरण परिसरात गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरून ते पाणी नदीला सोडण्यात आले आहे. मात्र कालव्याला पाणी सोडण्यात आलेले नाही.
सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी पुरपाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुख्यअभियंता जलसंपदा विभाग यांच्याकडे केली. (latest marathi news)
आमदार कोकाटे यांनी मांडलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यअभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांना तात्काळ पुरपण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आवर्तन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार..
"कडवाच्या पुरपाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्याची मागणी मान्य झाली असून सुटलेल्या आवर्तनातून पाणी योजनांचे तलाव, ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाजवळील तलाव , बंधारे भरण्यात येणार आहेत.त्यामुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याबाबत दिलासा मिळणार आहे." - आमदार माणिकराव कोकाटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.