नाशिक : बसस्थानकांवरील प्रतीक्षा कक्षापासून प्रसाधनगृहापर्यंतची नित्याची गैरसोय, जुनाट गाड्यांमुळे ‘प्रवासीराजा’ला रोजच यातना सहन कराव्या लागत आहेत. केवळ अभियानापुरता ‘प्रवासीराजा’चा मानसन्मान करण्यापेक्षा गैरसोयींचा कायमस्वरूपी निपटारा करावा, अशी माफक अपेक्षा आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जुलैमध्ये ‘प्रवासीराजा दिन’ झाला. परंतु ३६५ दिवसांत ‘प्रवासीराजा’ वाऱ्यावरच असल्याचे वास्तव आहे. (citizen Frustrated by problems at old ST bus stand)
गाड्यांची स्थिती
-बहुतांश शिवशाही भररस्त्यात पडतात बंद.
-इतरही प्रवाशांना ‘ब्रेकडाउन’चा फटका.
-गाड्यांमधून प्रथमोपचार पेटी गायब, अग्निरोधक यंत्रणा नावापुरती.
-हेडलाईट, पाठीमागील भागाच्या मलमपट्टीतून काम धकविण्याचा प्रयत्न.
-धावणाऱ्या गाड्यांची तांत्रिक वैधता तपासण्याची गरज.
असुविधांचे आगार
एन.डी. पटेल मार्गावरील आगार एकमध्ये गाड्यांच्या देखभाल-दुरुस्ती होते. आगारात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने तळे तयार होते. स्वच्छतेचीही वानवा आहे.
‘ती’ची हेळसांड थांबावी
सर्वच बसस्थानकांवर हिरकणी कक्ष बंद, नाहीतर कक्षाभोवती पुरुषांचा वावर दिसतो. महिला प्रसानगृहाबाहेरदेखील पुरुष कर्मचारी असतात. याशिवाय प्रसाधनगृह वापरासाठी महिलांकडून सर्रास पैसे उकळले जातात. ही हेळसांड थांबण्याची अपेक्षा आहे.
प्रसाधनगृहात ‘फोन पे’ क्यूआर कोड
ठक्कर बझार स्थानकावर प्रसाधनगृहाच्या नावाखाली प्रवाशांची लूट होते. लघुशंकेसाठी जाऊ देण्याची एका ज्येष्ठ प्रवाशाची विनंती धुडकावत कर्मचारी अंगावर धावून गेल्याचे चित्र ‘सकाळ’च्या कॅमेऱ्यात कैद झाले. प्रवाशाकडे चौकशी केली असता, लघुशंकेसाठी दोन रुपये लागतील’, असे प्रत्युत्तर देतात, सुट्यांची अडचण कुणी सांगू नये म्हणून ‘फोन पे’चा क्यूआर कोड ठेवल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. प्रसाधनगृह सेवेबाबतचा वाद रोजचा असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. (latest marathi news)
प्रवाश्यानो, हे लक्षात घ्या!
-प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी विनामूल्य सेवा
-महिलांसाठी प्रसाधनगृह विनामूल्य
-गर्भवतींसाठी बसस्थानकात हिरकणी कक्ष
-तक्रार असल्यास आगारप्रमुखांकडे तक्रारीची सुविधा
@महामार्ग बसस्थानक...
-बैठकव्यवस्था अपुरी
-हिरकणी कक्षासमोर पुरुषांचे ठाण
-अरुंद फलाटामुळे तारांबळ
-दोनपैकी एक पाणपोई बंद
@ठक्कर बझार बसस्थानक
-सर्वदूर अस्वच्छता
-हिरकणी कक्ष अडगळीत
-प्रसाधनगृहाच्या नावाने प्रवाशांची लूट
-पोलिस सहाय्यता कक्ष बंद
@मेळा बसस्थानक
-अनधिकृत पार्किंगचा विळखा
-हिरकणी कक्ष, अन्य कक्षांना टाळे
-वैधता संपलेली अग्निरोधक यंत्रणा
-अपुरी आसनव्यवस्था
@जुने सीबीएस बसस्थानक
-संपूर्ण स्थानकातच खड्डे
-छत गळके, स्थानकालाच अवकळा
-अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर
-चौकशी कक्षासमोर व इतरत्र पाण्याचे तळे
-स्थानक आवारातून खासगी वाहनांचा वावर (latest marathi news)
नाशिक विभागातील स्थिती
-शिवशाही बस- ७४
ई-बस- १९
शिवनेरी बस- ११
ई-शिवाई बस- ९
सामान्य बस- ७१७
एकूण बस- ८३०
-रोजच्या फेऱ्या- दोन हजार
- रोजचे प्रवासी- सुमारे दोन लाख ५० हजार
-मिळणारे रोजचे उत्पन्न- एक कोटी ५० लाख
-प्रत्येकी एक हजार ९०० वाहक व चालक प्रवासी सेवेत
तीनस्तरांवर देखभाल, दुरुस्ती
पहिला स्तर : दैनंदिन- निर्धारित मार्गावर प्रवास झाल्यावर रोज चेसीस, ऑइल, ब्रेक तपासणी. तांत्रिक दुरुस्तीसह बसची नियमित स्वच्छता.
दुसरा स्तर : दसदिनी- दर दहा दिवसांनी बसच्या ढाच्यापासून इतर सर्व तपासणी. ऑइल बदलणे, मोठी दुरुस्ती, एअर फिल्टर व ऑइल फिल्टर बदलणे
तिसरा स्तर, दोन मासिक- दर दोन महिन्यांनी बसची संपूर्ण सर्व्हिसिंग, ग्रिसिंग.
प्रवासी म्हणतात...
श्रीकांत साळुंखे : एसटीने प्रवास करताना टोलनाक्यावर फास्टॅगची समस्या उद्भवली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत दोन तास ताटकळावे लागले.
नीलेश पाटील : ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खराब असल्याने चांगल्या बसगाड्या गरजेच्या आहेत. बऱ्याचदा पंक्चरसह इतर कारणांमुळे प्रवाशांची गैरसोय नित्याचीच आहे.
दीप्ती ठाकूर : जळगाव, धुळे मार्गावर बऱ्याच वेळा विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागते. या मार्गावरील शिवशाही बऱ्याच वेळा रस्त्यात बंद पडते.
''गाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती होते. वयोमर्यादा पूर्ण झालेल्या बस स्क्रॅप केल्या जातात. प्रवासात किंवा स्थानकावर प्रवाशांना समस्या उद्भवल्यास आगारप्रमुख, व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या सूचनेनुसार प्रत्येक बसमध्ये चालकाच्या केबिनमागे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.''-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नाशिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.