Nashik Special Train : 60 उत्सव विशेष ट्रेनचा नाशिककरांना होणार फायदा

Nashik citizen will benefit from 60 Utsav special trains news
Nashik citizen will benefit from 60 Utsav special trains newssakal
Updated on

Nashik Special Train : मध्य रेल्वेतर्फे उत्सवकाळात मुंबई एलटीटी-नागपूर, थिवी आणि दानापूरदरम्यान साठ उत्सव विशेष ट्रेन धावणार आहेत.

एलटीटी-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (२२ फेऱ्या) एलटीटीहून २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान (११ फेऱ्या) दर मंगळवार आणि गुरुवारी २०.१५ वाजता सुटेल. नागपूरला दुसऱ्या दिवशी १०.२५ वाजता पोचेल. (Nashik citizen will benefit from 60 Utsav special trains news)

०१०३४ ही गाडी २७ ऑक्टोबर ते १ डिसेंबरपर्यंत (११ फेऱ्या) दर बुधवारी आणि शुक्रवारी १३.३० वाजता नागपूरहून सुटेल. ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा येथे ही गाडी थांबेल.

एलटीटी- थिवी त्रिसाप्ताहिक (२६ फेऱ्या) गाडी एलटीटीहून १ ते २९ नोव्हेंबरपर्यंत (१३ फेऱ्या) दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी २२.१५ वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी दहाला पोचेल.

Nashik citizen will benefit from 60 Utsav special trains news
Navratri Special Story : वडील दिव्यांग, घरची जबाबदारी खांद्यावर उचलत पोरीनं उभारला १ कोटींचा व्यवसाय

०११३० त्रि-साप्ताहिक गाडी २ ते ३० नोव्हेंबरपर्यंत (१३ फेऱ्या) दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी १५.०० वाजता थिविम येथून सुटेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे ती थांबेल.

एलटीटी- दानापूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१२ फेऱ्या) गाडी एलटीटीहून २८ ऑक्टोबर ते २ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर शनिवारी १२.१५ वाजता सुटेल. ०१४१० गाडी २९ ऑक्टोबर ते ३ डिसेंबरपर्यंत (६ फेऱ्या) दर रविवारी दानापूर येथून १८.३० वाजता सुटेल. कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बक्सर, आरा येथे ती थांबेल.

Nashik citizen will benefit from 60 Utsav special trains news
Nashik News : जायकवाडीला 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश; जिल्ह्यातून 3 तर नगरमधून 5 टीएमसी पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.