Nashik Bamboo Items : बांबूने बनविलेल्या वस्तूंचे नागरिकांना आकर्षण! प्रचार, प्रसारासाठी वनविभागाचा उपक्रम

Latest Nashik News : अगदी वीस रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंतच्या मोबाईलच्या स्टॅन्ड पासून ते टेबलपर्यंत दोनशेहून अधिक प्रकारच्या विविध वस्तू येथे उपलब्ध आहे.
Bamboo items available for sale at an exhibition jointly organized by the Forest Department and Save Bamboo and Handicrafts.
Bamboo items available for sale at an exhibition jointly organized by the Forest Department and Save Bamboo and Handicrafts.esakal
Updated on

Nashik Bamboo Items : वन विभागाच्या अरण्यक वनधन विक्री केंद्रातून बांबूने बनविलेल्या घरगुती वापरातील वस्तूंचे नागरिकांना आकर्षण निर्माण झाले आहे. अगदी वीस रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंतच्या मोबाईलच्या स्टॅन्ड पासून ते टेबलपर्यंत दोनशेहून अधिक प्रकारच्या विविध वस्तू येथे उपलब्ध आहे.

त्र्यंबक रोडवरील एमपीएजवळील वनविभागाच्या जागेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे. वनविभाग व सेव्ह बांबू अँड हॅन्डक्राफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली व इकॉनॉमी या तत्त्वावर आधारित हे दालन सुरू आहे. आदिवासी पाड्यावरील उंबरठाण, पेठ, देवगाव येथे वस्तू तयार केल्या जातात.

निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने घरामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. बांबूने बनविलेल्या घरगुती वस्तू या अधिक काळ टिकतात. तसेच इकोफ्रेंडली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. (Citizens attracted to items made of bamboo)

Bamboo items available for sale at an exhibition jointly organized by the Forest Department and Save Bamboo and Handicrafts.
Pharmacy Admissions 2024 : ‘बी.फार्मसी’, ‘एम.फार्म.’ प्रवेशनिश्‍चिती आजपासून

या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध

पेन, मोबाईल, न्यूज पेपर स्टॅन्ड, फ्लॉवर पॉट, आकाश कंदील, लॅम्प, खुर्ची, टेबल, टोकरी, डायनिंग टेबलवर ठेवण्यात येणाऱ्या डिश, मीठ, लोणचे, बरणी स्टॅन्ड, फाईल ट्रे फुलांच्या करंड्या, बैलगाडी, जहाज, चिमण्यांची घरटे, चिमटे, पेपर वेट, टिपऱ्या इत्यादी.

"नागरिकांना बांबूंच्या वस्तू बद्दल आकर्षण आहे.मात्र त्या वस्तू खरेदी करण्याकडे अल्प प्रमाणात कल आहे.बांबू हे बहुउपयोगी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी व नैसर्गिक समतोलासाठी नागरिकांनी बांबूच्या वस्तूंना प्राधान्य द्यावे." - अजित टक्के, सेव्ह बांबू ॲण्ड हॅन्डक्राफ्ट

Bamboo items available for sale at an exhibition jointly organized by the Forest Department and Save Bamboo and Handicrafts.
ऑप्टिमिझम, पेसिमिझम बायस आणि तुमचे आर्थिक निर्णय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.