Nashik News : रोप खरेदीसाठी नागरिकांची पावले नर्सरीकडे; 3 महिन्यात लाखोंची उलाढाल

Nashik : कोरोनाकाळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आल्याने नागरिकांचा कल आता ऑक्सिजन देणाऱ्या झाड लावण्याकडे वाढला आहे.
nurseries
nurseries esakal
Updated on

Nashik News : रोपांच्या लागवडीकरिता पावसाळा हंगाम सर्वोत्तम आणि पोषक मानला जातो. कोरोनाकाळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आल्याने नागरिकांचा कल आता ऑक्सिजन देणाऱ्या झाड लावण्याकडे वाढला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच रोप खरेदीसाठी नर्सरीकडे लोकांची पावले वळू लागली आहेत. बेडरूम, हॉलमध्ये ऑक्सिजन देणारी झाडे हवी म्हणून बोन्साय केलेली वड, पिंपळ, कडुनिंब खरेदी केली जात आहे. (Citizens go to nurseries to buy plants turnover of lakhs in three months )

एवढेच नाहीतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर झाडे उपलब्ध झाल्याने संशोधन करून नागरिक झाड खरेदी करीत आहेत. शहरात ५० हून अधिक छोट्या मोठ्या नर्सरी असून जून ते ऑगस्टदरम्यान १५ लाख रुपयांपर्यंतची रोप विक्री तसेच बागकामच्या साहित्य विक्रीतून होते. इतर हंगामात मात्र नर्सरीचा व्यवसाय लॅण्डस्केपिंगवर अवलंबून असतो.

पावसाळ्यात झाडाची काडी लावली तरी त्याचे रोप तयार होते. घरात किंवा घरालगतच्या परिसरात छोटीसी बाग असावी म्हणून जागेनुसार रोप खरेदी केली जात आहेत. एका झाडाच्या असंख्य व्हरायटी असल्याने फुलझाडांच्या रंगामध्ये फरक असतो. ५० ते ६० प्रकार निव्वळ फुलझाडांचे नर्सरीत बघायला मिळतात.

नर्सरी व्यवसाय परवडेना..

नर्सरी व्यवसायात आता पूर्वीसारखे कुतूहल राहिले नाही. आंध्र प्रदेशातील कडियाम शहरात देशातील सर्वात मोठी असल्याने नागरिक आता ऑनलाइन खरेदीकडे वळला आहे. १० हजार एकरात असलेल्या या नर्सरीत लाखो रुपयांची विविध झाडे उपलब्ध असून दररोज ५ कोटी झाडांची विक्री त्यातून होते. आंध्र प्रदेशात ४५ ते ४८ तापमान असल्याने झाडांच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक ठरते. तुलनेने नाशिक थंड शहर असल्याने झाडांची मुळांची पाहिजे तशी वाढ होत नाही. परिणामी झाडांचा सांभाळ करणे अवघड होते. (latest marathi news)

nurseries
Nashik News : नाशिकमधील महिला गुंतवणूकदारांच्या ‘एयूएम’मध्ये 5 वर्षांत 3.9 एक्स पटीने वाढ

देशी झाडांची लागवड करा

विदेशी झाडांची वाढ जलद होते. त्यामुळे ग्राहकांचा कल पूर्वी विदेशी हायब्रीड झाड लावण्याकडे अधिक होता पण, विदेशी झाडांवर पक्षी बसत नाही. शिवाय झाडाच्या लाकडापासून निघणारा धूर कडू निघतो. झाडांचे आयुष्य कमी असते. झाडाचे लाकूड ठिसूळ असते.

कोरोनाकाळानंतर आता पुन्हा नागरिक देशी झाडांकडे वळली असून देशी झाडाला अधिक पसंती देत आहेत. रोपटे लहान असताना त्याला व्यवस्थित खतपाणी घातले तर भविष्यात चांगले फळ मिळते. त्यामुळे झाडांच्या वाढीपेक्षा झाडांचे महत्त्व समजून झाडांची निवड करा. देशी झाडांमध्ये आंबा, गुलमोहर, वड, पिंपळ, कडुनिंब अशी झाडे लावायला हवी.

''सफरचंद आपल्याकडे कधी लावले गेले नव्हते पण आता ९९ नावाचे सफरचंदाचे झाड लावले जात आहे, ॲवाकाडो लावला जातोय. शेतकऱ्यांचा फळझाडे लावण्याकरिता अधिक कल असतो तर, शहरात राहणारे नागरिक ऑक्सिजन देणारी झाडे व फुलझाडे लावण्याला पसंती देतात.''-अनिकेत भोर, नर्सरी चालक

nurseries
Nashik News : मुख्यालयी थांबा अन्यथा प्रशासकीय कारवाईचा बडगा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरेंची तंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.