Police Recruitment : पोलीस भरतीला नाशिकला आलेल्यांची निवासाची सोय!

Nashik News : नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण पोलीसांनी मैदानी चाचणीला आलेल्या युवकांच्या निवासाची सोय केली आहे.
Police Recruitment
Police Recruitmentesakal
Updated on

Nashik News : राज्यभर पोलिस भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरु आहेत. ऐरवी, भरतीला येणाऱ्या युवकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. परंतु नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण पोलीसांनी मैदानी चाचणीला आलेल्या युवकांच्या निवासाची सोय केली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील ११८ रिक्त शिपाई पदांसाठी ७ हजार उमेदवारांची अर्ज केले आहे. (Nashik City and Nashik Rural Police have arranged accommodation for youth who appeared for field test)

त्यानुसार आजपासून मैदानी चाचणीला प्रारंभ झाला. रोज किमान ५०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले आहे. परजिल्ह्यातून वा जिल्हाभरातून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिक शहर पोलिसांतर्फे पंचवटीतील लामखेडा मळ्यातील राजमाता क्रीडा संकुल येथे निवासाची सोय करण्यात आली आहे.

यासाठी उमेदवारांनी पोलीस अंमलदार अभिजित पैठणकर (९९२३४९०४०४), अक्षय कदम (९६८९३३६४५९), रोहित जाधव (९९६०२९०१९२) यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (latest marathi news)

Police Recruitment
Police Recruitment : जागा २०२, अर्ज २० हजार; पुणे शहरातील पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात

तसेच, नाशिक ग्रामीण पोलीस दलाती ३२ रिक्त जागासाठी सुमारे ५ हजार अर्ज आलेले आहे. ग्रामीणची मैदानी चाचणी आडगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेतली जात आहे. यासाठी येणार्या उमेदवारांची निवासाची सोय मुख्यालयातील वस्तीगृहात करण्यात आलेली आहे.

Police Recruitment
Police Recruitment : पोलिस भरतीसाठी संधी मिळेपर्यंत माघार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.